स्वस्तातील सोन्याचा मोह पडला महागात

स्वस्तातील सोन्याचा मोह पडला महागात

व्यापार्‍याला मारहाण करत 12 लाखांना लुटले

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

स्वस्तात सोने (Cheap Gold) घेण्याचा मोह एका उत्तर भारतीय व्यापार्‍याला (merchant) चांगलाच महागात पडला आहे. स्वस्तात सोने (Cheap Gold) देतो म्हणून चौघा ठगांनी सुपा परिसरात बोलवत परप्रांतीय व्यापार्‍याला व त्याच्या साथीदाराला मारहाण (Beating) करत बारा लाखाला लुटल्याचा (Robbed) प्रकार आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडला.

भुवनलाल कन्हैलाल वर्मा (रा. अलमोडी जिल्हा, उत्तराखंड) असे तक्रार देणार्‍या व्यापार्‍याचे नाव आहे. याबाबत सुपा पोलिसांनी (Supa Police) दिलेल्या माहितीनुसार उत्तराखंड (Uttarakhand) राज्यातील अलमोडा (Almoda) जिल्ह्यातील व्यापारी भुवनलाल कन्हैलाल वर्मा यांना दुरध्वनीद्वारे स्वस्तात सोने देण्याची तयारी नगर येथील ठगांनी दाखवली होती. या व्यवहारासाठी पुणे - नगर महामार्गालगत (Pune-Nagar Highway) पारनेर तालुक्यातील (Parner Taluka) सुपा -पवारवाडी जवळील झाडी वस्ती येथे भेट ठरली होती. त्यानुसार मंगळवारी (दि 14) दुपारी 3 वाजेच्या दरम्यान वर्मा हा व्यापारी एका सहकार्‍यासोबत 12 लाख रूपये रक्कम असलेली बॅग घेऊन या ठिकाणी आला होता.

त्यांना महामार्गाच्या कडेला दोघेजन भेटेले त्यांनी सोने (Gold) डोंगराच्या खालच्या बाजुस लपवले असून त्या ठिकाणी येण्यास सांगीतले. त्या ठिकाणी अगोदरच तीन ते चारजण दबा धरून बसले होते. व्यापारी व त्याचा सहकारी तेथे पोहचताच सर्वांनी त्यांना घेरून पैशांची बॅग हिसकावली. तसेच दोघांना बेदम मारहाण करत ठग तेथून पळून गेले. याबाबत व्यापारी भुवनलाल वर्मा यांनी रात्री उशीरा सुपा पोलिसांना (Supa Police) कळवले यानंतर सुपा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत पंचनामा केला तसेच चौकशी चालू केली आहे.

अहमदनगर पुणे महामार्गा लगत भर दिवसा हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे अहमदनगर जिल्ह्यात यापुर्वीही स्वस्त सोने (Cheap Gold) घेण्याच्या लालसेपोटी अनेकांना लुटल्याचे प्रकार घडले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com