चासमध्ये पतसंस्थेला 26 लाखाचा गंडा

कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
चासमध्ये पतसंस्थेला 26 लाखाचा गंडा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

किराणा दुकानासाठी (Grocery Store) पतसंस्थेतून कर्ज (Loans from Credit Union) घेतले. या कर्जासाठी पतसंस्थेकडे तारण असलेली मिळकत जमिनीचे बनावट कागदपत्र दुय्यम निबंधक कार्यालयात (Second Registrar Office) सादर करून गहाण खत (Mortgage) रद्द करण्यात आले. चास (Chas) (ता. नगर) गावामध्ये कर्जदाराने हा प्रकार केला. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) गुन्हा दाखल झाला आहे.

चासमध्ये पतसंस्थेला 26 लाखाचा गंडा
राज्यपालांचे वक्तव्य हे बंधूभावाचे वातावरण बिघडवण्याचे

सूर्यभान केरू शेलार (वय 59, रा. चास) यांनी किराणा व्यवसायासाठी (Grocery Store) गावातीलच साईकृपा नागरी सहकारी पतसंस्थेतून (Saikrupa Civil Co-operative Credit Union) ता. 18 सप्टेंबर 2017 रोजी व्यवसायासाठी दहा लाखांची कर्ज (Loan) घेतले होते. या कर्जासाठी त्यांनी ग्रामपंचायत मिळकत क्रमांक 240 ही दुय्यम निबंध कार्यालयासमोर गहाण खत करून दिले होते. त्यानंतर त्यांनी याच मिळकतीवर 11 एप्रिल 2019 रोजी आणखी दहा लाख रुपये कर्ज (Loan) घेतले. त्यांच्याकडून पतसंस्थेचे 26 लाख 3 हजार 105 रुपये येणे बाकी होते. पतसंस्थेने (Credit Union) या कर्ज वसुलीसाठी (Loan Recovery) गहाण मिळकत जप्त (Seized) करण्यासाठी विशेष वसुली व विक्री अधिकारी, मार्केट यार्ड, अहमदनगर (Ahmednagar) या कार्यालयाशी पत्रव्यवहार केला. या कार्यालयाने या मिळकतीवर जप्तीचा आदेश दिला.

चासमध्ये पतसंस्थेला 26 लाखाचा गंडा
ऑनलाईन लॉटरी, बिंगो गुन्ह्यात वाढीव कलमे

पतसंस्था फेडरेशनला या मालमत्तेचा अद्ययावत असा सातबारा उतारा आवश्यक होता. त्यामुळे त्यांनी ऑनलाईन डिजिटल उतारा काढला. त्यावेळेस या मिळकतीवरील जप्ती व कर्जाचा बोजा असलेला फेरफार कमी केलेला होता. सदरची मिळकती उमा राजेंद्र भोर यांनी खरेदी केली होती. त्यांच्या नावाची सात-बारा उतार्‍याला नोंद झाली होती. त्यानंतर या प्रकरणात चौकशी करून सुरू करण्यात आली. कर्जदार सूर्यभान शेलार यांनी विजय अमरनाथ सरोज (रा. हंगा, ता. पारनेर), संतोष सूर्यभान शेलार, संजय नारायण उदमले यांनी संगनमताने पतसंस्थेचे बनावट पत्र तयार केले.

चासमध्ये पतसंस्थेला 26 लाखाचा गंडा
पिंप्री-वळण शिवारात वाळूचा टेम्पो पकडला

विजय सरोज याने पतसंस्थेचा सचिव असल्याचे बसवून दुय्यम निबंधक कार्यालय येथे ता. 12 मे 2022 रोजी गहाण खत रद्द केले. सदरचे कागदपत्र हे नगर भूमापन अधिकारी कार्यालयात देऊन मालमत्तेचा उतारावरील कर्जाचा बोजा कमी केला. सदरची मालमत्ता उमा भोर (रा. भोरवाडी, ता. नगर) यांना विक्री केली. पतसंस्थेच्यावतीने सचिव सतीश नेमाने यांच्या फिर्यादीवरून कर्जदार शेलार, सरोज, उदमले यांच्यावर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चासमध्ये पतसंस्थेला 26 लाखाचा गंडा
पिकअपच्या धडकेत चांद्याच्या तरुणाचा मृत्यू

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com