‘सीए’चे प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करू - खा. सुळे

‘सीए’चे प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करू - खा. सुळे
खासदार सुप्रिया सुळे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

चार्टड अकाउंटंट (सीए) अनेकांच्या जीवनातील प्रश्न सोडवतात; पण त्यांचे प्रश्न कोणीच सोडवत नाही. केंद्र सरकारने आणलेल्या अनेक नवीन कायद्यांमुळे सीए समोर प्रश्नांचा डोंगर आहे. ते प्रश्न सोडविण्यासाठी मी केंद्राकडे पाठपुरावा करेन, असे आश्वासन खा. सुप्रिया सुळे यांनी दिले. फॅमिली डॉक्टरप्रमाणे सीए आपल्या कुटुंबाचे अविभाज्य भाग असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

खा. सुळे या मंगळवारी अहमदनगर जिल्हा दौर्‍यावर होत्या. त्यांनी अहमदनगर शहरातील सीए भवनला भेट दिली. तेथे चार्टड अकाउंटंट संघटनेची बैठक घेतली. यावेळी आ. संग्राम जगताप, संघटनेचे महेश तिवारी, काळे, मुथ्या आदी मान्यवर उपस्थित होते. सुरूवातीला आयोजकांनी सीए भवनाबाबत माहिती दिली.

खा. सुळे म्हणाल्या, अहमदनगरमध्ये सर्वांनी एकत्र येत सीए भवन उभे केले, ते खरच कौतुकास्पद असल्याचे सांगत, स्वत: उभा केलेल्या संस्थेमध्ये सरकारसह राजकीय व्यक्तींनी हस्तक्षेप करणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. सध्या जगावर युध्दाचे संकट आहे. आपल्या देशात महागाई वाढत आहे. अनेक घडामोडी घडत असून या घडामोडीमध्ये सीए यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे खा. सुळे यांनी यावेळी सांगितले.

Related Stories

No stories found.