चांगदेवनगर रेल्वे फाटक बंद केल्याने पुणतांब्यात वाहतूक कोंडी

चांगदेवनगर रेल्वे फाटक बंद केल्याने पुणतांब्यात वाहतूक कोंडी

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

पुणतांबा येथून 2 किलोमीटरवर असलेल्या चांगदवनगर रेल्वे फाटक बंद केल्यामुळे पुणतांबा रेल्वे फाटकात वाहतूक कोंडी होत आहे.

दौंड-मनमाड रेल्वे मार्गावर रेल्वे खात्याच्या नियोजनानुसार सध्या पुणतांबा रेल्वे स्टेशनापासून दक्षिणेला अंदाजे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या चांगदेवनगर रेल्वे चौकीजवळ भुयारी पुलाचे काम 11 जानेवारीपासून सुरु आहे. काम वेगाने सुरु असून ते अंतिम टप्प्यात आहे. भुयारी पुलाच्या कामाची गरज ओळखून ठेकेदाराने रेल्वे अधिकार्‍याच्या संमतीने येथील रेल्वे फाटक 15 दिवसापासून बंद ठेवले आहे.

मात्र रेल्वे फाटक बंद झाल्यामुळे पुणतांबा येथील रेल्वे फाटकात वाहतुकीची कोंडी वाढ् लागल्यामुळे पुणतांबा मार्गे श्रीरामपूर व कोपरगावकडे जाणार्‍या प्रवासी वर्गाला अनेक अडचणीला तोंड द्यावे लागत आहे.

पुणतांबा येथील नियोजित भुयारी पुलाचे काम चांगदेवनगर येथील भुयारी पुलाचे काम पूर्ण झाल्यावर सुरु होणार आहे. या भुयारी मार्गाची जागा मागेच निश्चीत झाली असून खासदाराने सांगितले तरी त्यात बदल होत नाही व कामाला अंतिम मंजुरी दिल्यानंतर त्यात बदल होत नाही. रेल्वेच्या धोरणानुसार भुयारी पुलाची कामे होत असून त्यासाठी कोणीही प्रयत्न केले नाही. त्यामुळे पुणतांबा येथे रेल्वे फाटकात होणारी वाहतूक कोंडी ही लवकर दूर होईल व भुयारी पुलाचे तसेच गोदावरी नदीवरील पुलाचे कामही महिना भरात सुरु होण्याची शक्यता येथील ठेकेदाराच्या प्रतिनिधीने स्पष्ट केली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com