
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीने चंद्रयान 3 चे चंद्रावर यशस्वी लँडीग झाल्यामुळे महात्मा गांधी पुतळ्यासमोर फटाक्याची आतिषबाजी करून जल्लोष करण्यात आला.
जगामध्ये भारताच नाव रोशन करणार्या ईस्त्रोच्या शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आदींच्या अथक परिश्रमाने आपण हा सुवर्ण दिवस पाहिला अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. त्यावेळी स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन, उपाध्यक्ष संदीप मगर, तिलक डुंगरवाल, नागेश सावंत, तोफिक शेख, रियाज पठाण, ताराचंद रणदिवे, हनीफ पठाण, संतोष मोकळ, भैय्या भिसे, सुनील संसारे, भारत लोखंडे, दीपक कदम, रावसाहेब आल्हाट, लकी शेठी, राहुल रणपिसे, शुभम लोळगे, बदमे, विकास राजपूत, बाळू चांडोळे, योगेश ससाणे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चंद्रयान - 3 चे चंद्रावर यशस्वी लँडिंग झाल्याबद्दल येथील वॉर्ड नं. 7 मधील वढणे वस्ती, देवी मंदिर परिसरातील शाळकरी बालगोपाळ, देशभक्तांनी फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी या बालकांनी स्वयंस्फुर्तीने एकत्र येऊन हातातील तिरंगा दिमाखात फडकावून भारत माता की जय, वंदे मातरम् आणि हम होंगे कामया च्या घोषणा दिल्या. या चिमुकल्यांच्या देशभक्तीचे दर्शन पाहून सर्वांनी त्यांच्या समय सूचकतेचे कौतुक केले.