चांदेकसारेत लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

चांदेकसारेत लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

सोनेवाडी |वार्ताहर| Sonewadi

कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथे रवींद्र एकनाथ होन (वय 30) या तरुणाने आपल्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली आहे.

याबाबत कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला सतीश एकनाथ होन यांनी फिर्याद दिली असून कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनने अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. चांदेकसारे-सोनेवाडी गोरक्षनाथ रोड लगत होन यांची वस्ती व शेती आहे. सकाळी सतिश होन हे आपल्या शेतात चक्कर मारण्यासाठी गेले असता त्यांना आपल्या शेतात लिंबाच्या झाडाला रवींद्र एकनाथ होन यांचा मृतदेह फाशी घेतलेल्या अवस्थेत लटकलेला आढळून आला. त्यांनी तात्काळ शेजारी असलेले बंधू पंकज होन अन्य नातेवाईकांना यांना फोन करून घटनास्थळी बोलावून घेतले. घटना गंभीर असल्याने पोलीस पाटील मिराताई रोकडे, माजी सरपंच केशवराव होन व डॉ. गोरक्षनाथ होन यांनी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांना यासंदर्भात माहिती दिली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी तात्काळ सहाय्यक फौजदार अशोक आंधळे व त्यांच्या टीमला घटनास्थळी पाठवले. मयत झालेल्या रवींद्र होन यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी कोपरगाव तालुका ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. शवविच्छेदन केल्यानंतर होन यांचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. संध्याकाळी चार वाजेच्या दरम्यान त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात चांदेकसारे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 2/2022 लीलि/74 प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद केली असून ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अशोक आंधळे व श्री. कुसारे पुढील तपास करीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com