चांदेकसारे गावात गायत्री कंपनीचा मनमानी कारभार - रावसाहेब होन

चांदेकसारे गावात गायत्री कंपनीचा मनमानी कारभार - रावसाहेब होन

जेऊर कुंभारी |वार्ताहर| Jeur Kumbhari

कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे गावातून नावाप्रमाणेच समृद्ध असा समृद्धी महामार्ग जात असून या कामाचा ठेका चांदेकसारे हद्दीत गायत्री कन्स्ट्रक्शन या कंपनीला असून ही कंपनी स्थानिक शेतकर्‍यांचा जमिनीची, रस्त्याचे नुकसान करत मनमानी दडपशाही पद्धतीने वागत असल्याचे चित्र कायम समोर येत असल्याचे रावसाहेब होन यांनी म्हटले आहे.

चांदेकसारे गावात समृद्धी महामार्ग कामकाज चालू असून रावसाहेब रामजी होन यांची चांदेकसारे गावात शेती आहे. सर्वे नंबर 5 यातून गायत्री कंपनी कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता रावसाहेब रामजी होन यांच्या शेतातून डंपरची वाहतूक सुरूच आहे.

यासंदर्भात रावसाहेब होन यांनी गायत्री कंपनीच्या अधिकार्‍यांना याविषयी कल्पना दिली की, आमच्या शेतातून डंपरची वाहतूक करू नये. त्यामुळे सदर शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच घरांना भेगाही पडत आहे. याविषयी वारंवार कल्पना गायत्री कंपनीच्या अधिकार्‍यांना सूचना देऊनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. रावसाहेब होन यांच्या सर्वे नंबर 5 लगत दलित वस्ती असून रात्रीच्यावेळी गायत्री कंपनीचे डंपर वेगाने धावत असतात. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

चांदेकसारे गावात गायत्री कंपनीचा हा मनमानी कारभार पाहता यांना कोणी पाठीशी घालीत आहे का? असा प्रश्न रावसाहेब होन यांच्यासमोर निर्माण झाला आहे. गायत्री कंपनीने वेळीच डंपर बंद करावा नाहीतर मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडले जाईल, असा इशारा रावसाहेब होन यांनी दिला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com