माळवाडगांव |वार्ताहर| Malvadgav

शेतकर्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून पसार झालेल्या मुथ्था कुटुंबातील आरोपी चाँदनी चंदन मुथ्था हीला

आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला तीन दिवस म्हणजेच 10 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यापुर्वी जेरबंद केलेल्या दोघा आरोपींकडे या गुन्ह्यातील मुख्य आरोपी कुठे आहे, मुद्देमाल कोठे आहे याची चौकशी सुरू आहे.

श्रीरामपूर तालुका पोलिसांकडून तिसरी महिला आरोपी चाँदनी मुथ्था हिस श्रीरामपूर न्यायालयात हजर करण्यात आले. चाँदनी मुथ्था हिच्या समवेत दोन लहान मुली असून तीची तब्येत अशक्त आहे. तीचा पती व सासरा गुन्ह्यात असल्याने तीला जामीन देण्यात यावा, असा युक्तिवाद आरोपीच्यावतीने अॅड. मयुर गांधी यांनी केला.

तपास अधिकारी पोलीस निरीक्षक मधुकर साळवे न्यायालयासमोर म्हणाले, की काबाड कष्ट करण्यार्या शेतकर्यांची फसवणूक झाली. त्यांच्या मागेही लहान लहान मुले असून मुख्य आरोपींचा ठावठिकाणा या आरोपीस माहिती असून तपास कामासाठी पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी केली.

सरकार पक्षाच्यावतीने अभियोक्ता अॅड. वळवी यांनी काम पाहिले. दोन्ही पक्षांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने 10 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सायंकाळी तपास अधिकारी पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी आरोपीस वखार महामंडळ, गोडावूनसह एका पतसंस्थेच्या कार्यालयात मुद्देमाल तपासकामी नेले होते.