चंदनापुरीसह 5 गावांसाठी पाणीपुरवठा योजनेसाठी 59 कोटी मंजूर

चंदनापुरीसह 5 गावांसाठी पाणीपुरवठा योजनेसाठी 59 कोटी मंजूर
पाणी पुरवठा

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली व इंद्रजीत थोरात यांच्या सततच्या पाठपुराव्यातून चंदनापुरी, झोळे, हिवरगांव पावसा, आनंदवाडी, गणेशवाडी या 5 गावांकरिता जलजिवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत 59 कोटी 97 लाख 16 हजार रुपये मंजूर झाल्याची माहिती माजी जि. प. सदस्य मिलींद कानवडे यांनी दिली आहे.

चंदनापुरी, झोळे, हिवरगांव पावसा, आनंदवाडी, गणेशवाडी या 5 गावांकरिता एकत्रित पाणीपुरवठा योजना मंजूर करून त्या गावांना स्वच्छ व मुबलक पाणी मिळेल यासाठी प्रयत्न केले आहे.

महाराष्ट्र सरकारकडून जलजिवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत चंदनापुरी, झोळे, हिवरगांव पावसा, आनंदवाडी, गणेशवाडी, या 5 गावांकरिता जलजिवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत 59 कोटी 97 लाख 16 हजार रुपये मंजूर झाले आहेत. यामुळे या सर्व गावांना शाश्वत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणार आहे.

Related Stories

No stories found.