
संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner
अज्ञात चोरट्याने 2 लाख 87 हजार रुपयांचे दागिने चोरून पोबारा केल्याची घटना तालुक्यातील चंदनापुरी (Chandanapuri) येथे रविवारी मध्यरात्री घडली.
संगमनेर (Sangmner) तालुक्यातील चंदनापुरी येथील रहिवासी ताराबाई उत्तम राहाणे या आई आजारी असल्याने तिला भेटण्यासाठी माहेरी गेल्या होत्या. अज्ञात चोरट्याने (Thieves) या संधीचा फायदा घेतला. चोरट्याने घराचे पुढील दरवाजाचे कडी-कोयंडा उचकटून आत प्रवेश केला व रहाणे यांच्या घरातून 1 लाख 35 हजार रुपये किंमतीची 5 तोळे वजनाचे एक सोन्याचे गंठण, 81 हजार रुपये किमतीची 3 तोळे वजनाची सोन्याची एक मोहन माळ, 40 हजार 500 रुपये किमतीचे दीड तोळे वजनाचा सोन्याचा एक नेकलेस, 10 हजार 800 रुपये किमतीचे 4 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दोन वेल, 5 हजार 400 रुपये किमतीचे 2 ग्रॅम वजनाचे लहान बाळाचे कानातील सोन्याच्या बाळ्या, 15 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 2 लाख 87 हजार 700 ऐवज चोरून नेला आहे.
या चोरीबाबत माहिती समजताच श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते. पथकातील श्वानाने मार्ग काढण्याचा प्रयत्न केला मात्र यश आले नाही. याबाबत ताराबाई उत्तम रहाणे यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गु. र.नं. 327/2021 भा.दं.वि. कलम 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार आय. ए. शेख हे करीत आहे.