चंदनापुरी घाटातील दरीत कोसळली कार, एअर बॅगमुळे वाचले चौघं

चंदनापुरी घाटातील दरीत कोसळली कार, एअर बॅगमुळे वाचले चौघं

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

नाशिक -पुणे महामार्गावरील (Nashik-Pune Highway) चंदनापुरी घाटात (Chandanapuri Ghat) कार कोसळल्याची (Car Accident) घटना काल रविवारी दुपारी घडली आहे. यामध्ये सुदैवाने कारमधील दोघेही बचावले आहे.

गौरव सुनिल गलांडे हा त्याच्या हा त्याच्या ताब्यातील स्विप्ट कार एम. एच. 17 बी. व्ही. 8291 घेवून संगमनेरच्या (Sangamner) दिशेने येत होता. दरम्यान वळणावर आला असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने स्विप्ट कार थेट 50 फुट खोल दरीत कोसळली. (Collapsed in the valley) मात्र कारमधील एअर बॅग (Airbag) ओपन झाल्याने सुर्दैवाने कारमधील गौरव गलांडे, सुनिल गलांडे हे बचावले आहे. वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती कळताच महामार्ग पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे व त्यांचे सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहनातील किरकोळ जखमी (injured) झालेल्या दोघांना उपचारार्थ दवाखान्यात हलविण्यात आले.

Related Stories

No stories found.