चांदा येथील श्री गणेश सेवा सोसायटीसाठी 14 मे रोजी मतदान

एका अपक्षासह दोन पॅनलमध्ये होणार सरळ लढत
चांदा येथील श्री गणेश सेवा सोसायटीसाठी 14 मे रोजी मतदान

चांदा |वार्ताहर| Chanda

नेवासा तालुक्यातील चांदा येथील श्री गणेश विविध कार्यकारी सेवा सोसायटीची निवडणूक होणार हे आता निश्चित झाले असून अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी 13 जागांसाठी 27 उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

एकूण 13 जागांसाठी 70 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. अर्ज माघारीच्या दिवसअखेर 13 जागांसाठी दोन पॅनलचे मिळून 26 उमेदवार व एक अपक्ष असे 27 उमेदवारांचे अर्ज शिल्लक राहिले आहेत.

सत्ताधारी श्री सोमेश्वर शेतकरी सहकारी पॅनलचे नेतृत्व माजी सभापती कारभारी जावळे, अनिलराव अडसुरे, मुळा कारखान्याचे संचालक बाबुराव चौधरी, तंटामुक्ती अध्यक्ष मोहनराव भगत आदी करत असून विरोधी जनसेवा शेतकरी पॅनेलचे नेतृत्व राष्ट्रवादी सेलचे अध्यक्ष भाऊसाहेब जावळे, उपसरपंच चांगदेव दहातोंडे, भाजपाचे कैलास दहातोंडे हे करत आहेत.

एकीकडे उन्हाचा पारा चढलेला असताना आता सोसायटीच्या निवडणुकीच्या रणधुमाळीतने राजकीय पाराही चांगलाच तापणार आहे. 14 मे रोजी मतदान होणार असून प्रचाराची रणधुमाळी आता सुरू झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जी. एम. नांगरे हे काम पाहत असून सचिव विजय भोपे हे त्यांना सहकार्य करत आहेत.

Related Stories

No stories found.