महाराजांच्या घरावर दरोडा, तीन आरोपी जेरबंद

तिघेही नेवासा तालुक्यातील; 6 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी
महाराजांच्या घरावर दरोडा, तीन आरोपी जेरबंद

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यातील (Newasa Taluka) चांदा (Chanda) येथे 29 ऑगस्ट रोजी रात्री झालेल्या दरोड्याच्या (Robbery) घटनेतील तिघा आरोपींना अटक (Criminal Arrested) करण्यात नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (Nagar Local Crime Branch) पोलीस पथकाला यश आले. तिघेही आरोपी नेवासा तालुक्यातील (Newasa Taluka) आहेत. या सर्वांना काल नेवासा न्यायालयात (Newasa Court) हजर केले असता 6 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी (Police cell) देण्यात आली.

याबाबत माहिती अशी की 29 ऑगस्ट रोजी मध्यरात्री चांदा (Chanda) येथील आडभाई व गायकवाड वस्तीवर दरोडा (Robbery) पडला होता. सुमारे तीन लाखाचा मुद्देमाल चोरीस गेला होता.

पोलीस अधिक्षक मनोज पाटील (SP Manoj Patil) यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक अनिल कटके यांचे पथक या गुन्ह्याचा समांतर तपास करत होते. अशा प्रकारचे गुन्हे करणार्‍या व स्थानिक गुन्हे शाखेच्या अभिलेखावर असलेल्या सराईत गुन्हेगारांचे फोटो फिर्यादी व साक्षीदार यांना त्यांनी दाखविले. त्यातील काही फोटो फिर्यादी व साक्षीदार यांनी ओळखल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे, हवालदार सुनील चव्हाण, दत्तात्रय हिंगडे आदींनी आरोपींचा शोध घेत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन आरोपींचा शोध घेतला.

या गुन्ह्यात नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने (LCB) डांगर उर्फ प्रवीण छगन भोसले रा.मुकिंदपुर, सुदाम उर्फ शिवदास सुमन भोसले रा. गेवराई ता. नेवासा व पंकेश उर्फ पंक्या जगताप भोसले रा. फत्तेपुर ता.नेवासा यांना अटक करण्यात आली.

आरोपी डांगर उर्फ प्रवीण छगन भोसले याचे विरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात (Newasa Police Station) 2019 मध्ये दोन तर शिर्डी व वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल झालेला आहे. आरोपी सुदाम उर्फ शिवदास सुमन भोसले यांचे विरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात 2008 मध्ये एक तर नेवासा पोलीस ठाण्यात 2021 मध्ये एक असे दोन गुन्हे दाखल आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com