चांदा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गावांत करोना प्रतिबंधक लसीकरणास प्रतिसाद

आतापर्यंत 50 टक्केहून अधिक नागरिकांचे झाले लसीकरण
चांदा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गावांत करोना प्रतिबंधक लसीकरणास प्रतिसाद

चांदा |वार्ताहर| Chanda

नेवासा तालुक्यातील (Newasa Taluka) चांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात (Chanda Primary Health Center) कोवीड प्रतिबंधीत लसीकरणाने (Covid restricted vaccination) चांगलाच वेग घेतला असून या केद्राअंर्तगत येणार्‍या गावाचे एकत्रीत मिळून जवळपास पन्नास टक्के लसीकरण (Vaccination) पुर्ण झाले असून सध्या लसींची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर होत असल्याने नागरीकांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन चांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. सुधिर पुंड यांनी केले आहे.

चांदा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत (Chanda Primary Health Center) सोळा गावे येतात. त्यामधील काही गावांमध्ये जास्त तर काही गावांमध्ये कमी लसीकरण आकडेवारी उपलब्ध झाली असून सरासरी पन्नास टक्के पर्यंत लसीकरण झाले असल्याची माहिती केंद्राचे प्रमुख डॉ सुधिर पुंड यांनी दिली. प्राथमिक आरोग्य केंद्राकडे (Primary Health Center) संबंधीत गावांच्या सन 2011 मध्ये झालेल्या जनगणनेनुसार उपलब्ध लोकसंख्येच्या आकडेवारीनुसार ठरविण्यात आले आहे.

मात्र सध्याची गावची लोकसंख्या उपलब्ध आकडेवारीपेक्षा जास्त असणार आहे. आहे यासाठी आरोग्य केंद्रातील तसेच उपकेंद्रातील डॉक्टर्स आरोग्य सेवक-सेविका अथक परीश्रम करत आहेत.नागरीकांनी आरोग्य केंद्रावर गर्दी न करता उपलब्ध डोसनुसार हजर रहावे. बाहेर कुठेही फिरताना मास्कचा वापर करावा असे आवाहनही डॉ सुधीर पुंड यांनी केले आहे. सध्या डोस उपलब्धता मोठ्या प्रमाणावर होत असल्याने लवकरच गावांमधील लसीकरण शंभर टक्के पुर्ण होईल असे ते म्हणाले.

नेवासा तालुक्यात 40 हजार नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण

नेवासा तालुक्यात आतापर्यंत 1 लाख 43 हजार नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला असून जवळपास 40 हजार (39 हजार 399) नागरिकांनी दोन्ही डोस घेतले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिराज सुर्यवंशी यांनी दिली. सुरुवातीला लस उपलब्धता कमी प्रमाणात होती. आता उपलब्धता वाढल्याने लसीकरण घेतलेल्या नागरिकांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com