हत्या प्रकरणातील आरोपींना अटकेसाठी चांदा बंदला प्रतिसाद

हत्या प्रकरणातील आरोपींना अटकेसाठी चांदा बंदला प्रतिसाद

चांदा |वार्ताहर| Chanda

नेवासा (Newasa) तालुक्यातील चांदा (chanda) येथील ज्ञानदेव सोपान दहातोंडे हत्याप्रकरणातील आरोपींना अटकेसाठी (arrest of the accused in the murder case) आयोजित चांदा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

आठ दिवसात अटक न झाल्यास 12 जुलै रोजी पुन्हा आंदोलन (Movement) करण्याचा निर्धार निषेध सभेत (protest meeting) करण्यात आला. येथील ज्ञानदेव सोपान दहातोंडे (वय 42) यांची भरचौकात हत्या (Murder) होऊन महिना झाला तरी अद्याप पसार आरोपींना अटक झाली नाही तसेच गावात अवैध धंदे, गावठी कट्टे आदींचे प्रमाण वाढले असून दहशत आणि दादागिरी वाढली आहे.

पोलिसांचे याकडे दुर्लक्ष (police ignored) होत असल्याच्या निषेधार्थ गावातील सर्वपक्षांचे राजकीय पदाधिकारी व ग्रामस्थांनी गाव बंदचा निर्णय घेतला होता. व्यापार्‍यांनी आपआपली दुकाने बंद ठेवली होती. सकाळी नऊ वाजता चांदा बाजारतळावर सर्वपक्षीय नेतेमंडळी सर्व ग्रामस्थ एकत्र आले छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून निषेध सभेला सुरुवात झाली. यावेळी ज्ञानदेव सोपान दहातोंडे (Dyandev Sopan Dahatonde) यांची हत्या होऊन एक महिना उलटला हत्या करणारे आरोपी अजूनही पोलिसांना सापडत नसल्याबद्दल सर्वच वक्त्यांनी नाराजी व्यक्त केली.

मराठा शेतकरी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजीराव दहातोंडे, पंचायत समितीचे माजी सभापती कारभारी जावळे, अनिलराव अडसुरे, राष्ट्रवादी सेलचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब जावळे, भाजपाचे तालुका उपाध्यक्ष कैलास दहातोंडे, अ‍ॅड. योगेश दहातोंडे, अमित रासने, आरपीआयचे बाबासाहेब आल्हाट आदींनी आपल्या भाषणातून नाराजी व्यक्त केली. 12 जुलैपर्यंत सदर प्रकरणाचा तपास लागला नाही तर नगर- औरंगाबाद महामार्गावर घोडेगाव चौफुला येथे रास्तारोको आंदोलन करण्याचा निर्धारही या वेळी सर्वपक्षीय नेत्यांनी केला .

सोनईचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांनी निवेदन स्विकारले. त्यावेळी ते म्हणाले पोलिसांचा तपास योग्य दिशेने चालू आहे . पोलिसांची पथके आरोपींच्या शोधार्थ रवाना झाली आहेत. त्यातील आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. मात्र आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल. आरोपी संदर्भात ग्रामस्थांना काही माहिती मिळाल्यास त्यांनी निसंकोचपणे सांगावी त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल. त्यामुळे आपण गावबंदचा निर्णय मागे घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. त्याच्या आवाहनाला सहमती देत सभा संपल्यानंतर गावातील व्यवहार सुरळीत सुरू झाले.

दुपारी शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे हेही चांदयात दाखल झाले. ग्रामपंचायत कार्यालय सभागृहात त्यांनी सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांशी चर्चा केलील. गावातील अवैध धंद्यांचा तातडीने बंदोबस्त करू. हत्याप्रकरणातील आरोपींना लवकरच शोधून काढले जाईल . यासाठी एलसीबीचे पथकही तपास करत आहे .आरोपींना शिक्षा होणारच गावकर्‍यांनी यासाठी सहकार्य करावे. मी स्वतः या प्रकरणात लक्ष घालणार असल्याचेही त्यांनी उपस्थित पदाधिकार्‍यांना सांगितले.

या आंदोलप्रसंगी तंटामुक्ती अध्यक्ष मोहन भगत, माजी सरपंच संजय भगत, उपसरपंच चांगदेव दहातोंडे, बन्सीभाऊ गायकवाड, ज्ञानदेव दहातोंडे, डॉ विकास दहातोंडे, सुदाम जावळे ग्रा.पं. सदस्य रावसाहेब दहातोंडे, पोपट दहातोंडे, अरूण बाजारे, नितीन दहातोंडे, दीपक जावळे, नाथा जावळे, अ‍ॅड. योगेश दहातोंडे, बाबुराव दहातोंडे, अमीत रासने, अरूण दहातोंडे, शिवाजी दहातोंडे, संतोष दहातोंडे, अण्णा दहातोंडे, बाबासाहेब दहातोंडे, बाळासाहेब डागवाले, सुजित दहातोंडे, आरपीआयचे बाबासाहेब अल्हाट, हमीद शेख, झुंबर शेळके, चंद्रकांत जावळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

शेवगाव डीवायएसपींना निलंबित करा - दहातोंडे

शेवगाव उपविभागाअंतर्गत येणार्‍या गावांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे. चांदा गावासाख्या ठिकाणी भरचौकात तरुणाची निर्घृण हत्या होते. महिना उलटूनही पोलिसांना आरोपी सापडत नाहीत. अवैध धंदे खुलेआम सुरू आहेत. पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या प्रकरणास जबाबदार धरून शेवगाव उपविभागीय अधिकारी यांना निलंबित करावे यासाठी आपण उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांना समक्ष भेटून मागणी करणार असल्याचे शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजीराव दहातोंडे यांनी यावेळी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com