चांद्यात बिबट्याने पाडला शेळी व बोकडाचा फडशा

File photo
File photo

चांदा |वार्ताहर| Chanda

नेवासा तालुक्यातील चांदा परिसरात बिबट्याचा धुमाकूळ सुरूच असून रविवारी रात्री थिटे वस्तीवर बिबट्याने बोकड व शेळीचा फडशा पाडल्याने शेतकरी भयभयीत झाले आहेत.

येथील चांदा-रस्तापूर रोडवरील मायनर क्रमांक सात वरील गट नंबर 290 मध्ये गणेश सोपान थिटे यांची वस्ती आहे. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या घराबाहेर बांधलेल्या शेळ्यांवर बिबट्याने हल्ला केला. जाळी कंपाउंड असतानाही बिबट्याने हल्ला केला. त्यात एका शेळीला फस्त करून अंधारात दडून बसलेल्या बिबट्याने पुन्हा हल्ला करत एक बोकड घेऊन उसाच्या शेतात पळाला.

गणेश थिटे यांच्या लक्षात ही घटना आल्यानंतर त्यांनी पोलीस मित्र सचिन म्हस्के यांच्याशी संपर्क केला. त्यांनी या घटनेची कल्पना नेवासा वन अधिकारी श्री. सय्यद यांना दिली. त्यानंतर सकाळी वन विभागाचे श्री. गाढे यांनी येऊन घटनेचा पंचनामा केला. या परीसरात तीन बिबटे असल्याचे शेतकरी सांगत असून त्यामध्ये दोन बछडे व एक मादी आहे ,असे प्रत्यक्ष पाहणार्‍यांनी सांगितले. बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com