चांदा |वार्ताहर| Chanda

नेवासा तालुक्यातील राजकीयदृष्टया जागृत चांदा ग्रामपंचायतीत जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख गटाने

पुन्हा एकदा विजयश्री खेचून आणली असून त्याचेच निर्विवाद वर्चस्व सिद्ध झाले आहे. एकूण 17 जागांपैकी 13 जागा घेत बहुमत मिळविले असून विरोधकांना चार जागां मिळाल्या आहेत

नामदार शंकरराव गडाख यांच्या गटाने जनसेवा ग्रामविकास आघाडीच्या माध्यमातून आपले उमेदवार उतरवले होते. त्याचे नेतृत्व मराठा महासंघाचे प्रदेशाध्दक्ष संभाजीराव दहातोंडे, पं. स. माजी सभापती कारभारी जावळे, जिल्हा परिषद सदस्य अनिलराव अडसुरे, मुळाचे संचालक बाबुराव चौधरी, भेंडाचे संचालक मोहन भगत आदिंनी केले तर विरोधी गटाने शनैश्वर जनविकास आघाडी या पॅनलच्या माध्यमातून उमेदवार उभे केले होते त्यांचे नेतृत्व भाजपाचे कैलास दहातोंडे यांनी केले.

सहाही वार्डात मिळून अकरा अपक्ष असे 45 उमेदवार होते.

प्रभागनिहाय उमेदवारांची मते-

प्रभाग 1- विजयी-दहातोंडे बाळासाहेब मच्छिंद्र (696), दहातोंडे सुनिता संभाजी (681), दिवटे संगिता गोरक्ष (703). पराभूत-कुर्हे शरद मोहन (136), धुमाळ शहाजी सीताराम (287), सोनकर उद्धव नारायण (19), कर्डिले ताराबाई लक्ष्मण (453), जावळे मंगल दत्तात्रय (395).

प्रभाग 2-विजयी- जावळे अरुण बबन (़667), जावळे ज्योती दीपक (554), भालके ज्योती विष्णू (564). पराभूत- भालके सोमनाथ विठ्ठल (410), विधाटे अमोल रमेश (49), धाडगे संगिता ज्ञानदेव (552), जावळे रंजना सोन्याबापू (547).

प्रभाग 3- विजयी- दहातोंडे चांगदेव नारायण (535), लोखंडे कल्पना आबासाहेब (588). पराभूत- चौधरी आण्णा शिवाजी (73), चौधरी शिवाजी देवराव (301), पासलकर देविदास भानुदास (178), जावळे सुजाता चंद्रकांत (489).

प्रभाग 4- विजयी-पुंड बाळासाहेब पाराजी (416), शेख संमद अब्दुलरज्जाक (394), शेख हालिमा बशीर (451). पराभूत- पुंड अशोक मच्छिंद्र (287), समीर रशिद शेख (35), पठाण शब्बीर हसन (223), पासलकर देविदास भानुदास (53), रक्ताटे वसंत नाथा (71), शेख रुबिना शकुर (280).

प्रभाग 5-विजयी- गाढवे संतोष मायकल (627), दहातोंडे रावसाहेब कान्हू (593), जावळे वर्षा सागर (592), पराभूत- गाढवे सुशांत सुरेश (519), दहातोडें कैलास मुरलीधर (534), पासलकर देविदास भानुदास (32), जावळे सुवर्णा किरण (557).

प्रभाग 6-विजयी- दहातोंडे पोपट शिवाजी (605), थोरात सुनिता मोहन (604), दहातोंडे सुनंदा सदाशिव (680). पराभूत- दहातोंडे महेश अशोक (408), शेळके ज्ञानदेव गोरक्षनाथ (170), कानडे उषा लहूबाळ (289), थोरात मिरा ज्ञानेश्वर (284), दहातोंडे राजश्री बंडू (498).

निकालानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यकर्त्यानी गुलाल उधळत फटाक्यांच्या आतषबाजीने विजयी उमेदवारांच्या निकालाचे स्वागत केले.