
सोनई |वार्ताहर| Sonai
नेवासा तालुक्यातील चांदा येथील शेतकर्याच्या घरातून मंगळवार 13 रोजी 14 तोळे 3 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 160 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने व रोख 61 हजार रुपये असा ऐवज चोरी गेल्याने सोनई पोलीस ठाण्यात बुधवार दिनांक 14 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाबासाहेब चिमणराव जावळे, वय 52, रा. जावळे वस्ती, लोहारवाडी रोड, चांदा यांनी सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की मंगळवार दिनांक 13 जून रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान घरातून सोन्याचे 24 ग्रॅम वजनाच्या दोन पोती, दोन तोळे वजनाचे दोन जोड झुंबर, तीन तोळे वजनाचे मोठे गंठण, सोन्याचे दहा ग्रॅम वजनाचे नेकलेस, सोन्याचे सहा ग्रॅम वजनाचे कानावर घालायचे जोडवेल, सोन्याचे 20 गॅ्रम वजनाचे लॉकेट, सोन्याच्या 20 ग्रॅम वजनाच्या तीन अंगठ्या, सोन्याच्या आठ ग्रॅम वजनाच्या दोन अंगठ्या, सोन्याच्या चार ग्रॅम वजनाच्या चार पळ्या, सोन्याचे दोन ग्रॅम वजनाची अंगठी, सोन्याच्या एक ग्रॅम वजनाचे लहान मुलाचे कुडक, सोन्याचे एक ग्रॅम लहान बाळाचे कानातील बाळी, चांदीच्या 160 ग्रॅम वजनाचे दागिने, 61 हजार रुपये रोख रक्कम असे एकूण 143 ग्रॅम सोने, 160 ग्रॅम चांदी व 61 हजार रुपयांची रोख रक्कम, असा ऐवज चोरीस गेला आहे.
सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 266/23 भादंवि कलम 454,380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल दत्ता गावडे पुढील तपास करत आहेत.