चांदा |वार्ताहर| Chanda

नगर जिल्ह्यात सलग तिसर्या दिवशी अवकाळी पावसाचा दणका सुरू आहे. काल नेवासा तालुक्यातील चांदा-बर्हाणपूर परीसरात

काल सोमवारी वादळी वार्यासह पाऊस झाला. कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव परिसरात, राहात्यातील राजुरी, श्रीरामपूर शहर व परिसरात अवकाळी पावसाच्या तडाख्याने रब्बी पिकांचीे वाट लावली. काही भागात गाराही झाल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.

सोमवारी रोजी दुपारी चार वाजेदरम्यान अचानक पावसाला सुरुवात झाली. सोसाट्याचा वारा त्याचबरोबर मुसळधार पाऊस सुरू झाल्याने शेतकर्याची प्रचंड धावपळ उडाली. हा अवकाळी पाऊस पावसाळ्यात कोसळावा असाच जोराचा होता.

गेली दोन दिवसापासून या भागात पाऊस अत्यल्प होत होता. मात्र सोमवारचा पाऊस भयंकर वादळासह आल्याने सर्वत्र पाणी साचले. बर्हाणपूर परीसरातील बहुतांशी भागात गाराही झाल्याने काढणीस आलेल्या शेकडो एकर गव्हासह इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

गहू भुईसपाट झाला. कांद्यालाही याचा जबरदस्त फटका बसला आहे. फळ पिकांचेही नुकसान झाले. आंब्याचा मोहोर वादळाने गळाला आहे. दोन दिवसापासून गहू काढण्यासाठी शेतकरी हार्वेस्टिंग मशीन मागे फिरत होते. ओला सुका कसाही करून गहू काढणी करण्यासाठी धावपळ करणार्या शेकडो जणांचा गहू भिजला आहे.

चांदा येथील पुंडवाडी परीसरातही जोरदार पाऊस झाला आहे. चांदा परीसरातील बर्याच भागात वादळ जास्त मात्र पाऊस अत्यल्प झाला. सर्वाधिक नुकसान गहू आणि कांदा पिकाचे झाले असून आडवा झालेला गहू आता कसा काढायचा याची धास्ती बळीराजाला पडली आहे. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी शेतकर्यानी केली आहे.