पुढील ३ दिवस मुसळधार पावसाची शक्यता; जामखेड तहसीलदारांनी केले 'हे' आवाहन

पुढील ३ दिवस मुसळधार पावसाची शक्यता; जामखेड तहसीलदारांनी केले 'हे' आवाहन

जामखेड | तालुका प्रतिनिधी

भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार पुढील ३ दिवस मुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता वर्तवली आहे.

त्यामुळे तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे जामखेड तालुक्यातील नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सुचानाचे पालन करण्याचे आवाहन जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले आहे. त्यांनी म्हंटल आहे की, सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे. नदी, ओढे व नाल्याच्या काठी राहणाऱ्या नागरिकांनी दक्ष राहावे. तसेच पाणी पातळीत वाढ होता असताना नागरिकांनी नदी, ओढे, नाले यापासून दूर राहावे व सुरक्षित स्थळी स्थलंतरीत व्हावे.

नदी अथवा नाले यावरील पुलावरून पाणी वाहत असताना पूल ओलांडू नये. पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये. धोकादायक झालेल्या तलावांच्या क्षेत्रामध्ये राहणाऱ्या नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे. धरण व नादिक्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणार्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. नदीच्या प्रवाहामध्ये उतरू नये. धोकादायक ठिकाणी चढू नये, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. मेघगर्जना होत असताना झाडाखाली अथवा विद्यूतवाहिनी जवळ थांबू नये. आपत्कालीन परिस्थितीत जामखेड तहसिल कार्यालय नियंत्रण कक्षात संपर्क करावा असे आवाहन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी आवाहन केले आहे.

Related Stories

No stories found.