खाजगी कारखानदारीचे आव्हान समर्थपणे पेलणार - बिपिन कोल्हे

एक खिडकी योजना राबविणारा कोल्हे कारखाना राज्यातील एकमेव
खाजगी कारखानदारीचे आव्हान समर्थपणे पेलणार - बिपिन कोल्हे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी सहकारी साखर कारखानदारीला दिशा देण्याचे काम केले असून सहकारासमोर पुन्हा खाजगीचे आव्हान उभे राहिले आहे. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना त्या तुलनेत हे आव्हान समर्थपणे पेलेल आणि राज्यात एक खिड़की योजना राबविणारा पहिला कारखाना असेल, अशी ग्वाही संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी दिली.

सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे कारखाना कार्यस्थळावर सालाबाद प्रमाणे याही वर्षी लक्ष्मीपूजन माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्याहस्ते संपन्न झाले त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, चालू गळितास 8 लाख 25 हजार मे. टनाचे उद्दिष्ट दिले असून त्यादृष्टीने वाटचाल सुरू आहे व कारखाना येत्या दोन महिन्यांत आय एस ओ 9001_2015 प्रक्रिया पूर्ण करेल असे ते म्हणाले. याप्रसंगी तज्ञ संचालक विवेक कोल्हे, ज्येष्ठ नेते दत्तात्रय कोल्हे, उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे, विधिज्ञ रवी बोरावके, संचालक अरुणराव येवले, संजय होन, शिवाजीराव वक्ते, विलास वाबळे, निवृत्ती बनकर, मनेष गाडे, बाळासाहेब वक्ते, विश्वासराव महाले, कामगारनेते मनोहर शिंदे, ज्ञानेश्वर परजणे, फकीरराव बोरनारे, पांडुरंगशास्त्री शिंदे, शिवाजीराव बारहाते, त्र्यंबकराव परजणे, विजय आढाव, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शरद थोरात, तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, रिपाइंचे दीपक गायकवाड, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे विविध संस्थांचे आजी-माजी संचालक, पदाधिकारी, कार्यकर्ते खातेप्रमुख, उप खातेप्रमुख, सभासद कामगार प्रतिष्ठित व्यापारी उपस्थित होते. लेखापाल एस. एन. पवार यांनी रोखपाल डी. डी. बोरणारे व आर. टी. गवारे यांना माजीमंत्री कोल्हे यांच्या हस्ते रोख बक्षीस दिले. उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे यांनी आभार मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com