पिचड, गायकर, ससाणे आणि जगताप यांची उमेदवारी दाखल

65 इच्छुकांचे 460 उमेदवारी अर्ज
पिचड, गायकर, ससाणे आणि जगताप यांची उमेदवारी दाखल

अकोले | प्रतिनिधी

राज्यात सर्वाधिक आर्थिकदृष्ट्या सक्षम असणार्‍या जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळासाठी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली आहे.

माजी आमदार व जिल्हा बँकेचे संचालक वैभवराव पिचड यांनी आज अनुसूचित जाती जमाती व शेतीपूरक मतदार संघातून तर बँकेचे विद्यमान चेअरमन सीताराम पाटील गायकर यांनी सोसायटी मतदार संघातून आपले उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जि प अर्थ व बांध. समितीचे माजी सभापती कैलासराव वाकचौरे, बाजार समितीचे सभापती परबत नाईकवाडी, अगस्ति कारखान्याचे ज्येष्ठ संचालक प्रकाश मालुंजकर, गुलाबराव शेवाळे, अशोक देशमुख, कचरू पा शेटे, अशोक आरोटे, राजेंद्र डावरे, महेश नवले, मच्छीन्द्र धुमाळ, बाळासाहेब भोर, प्रदीप हासे,अमोल वैद्य, सचिन शेटे, राहुल देशमुख, किसन आवारी, सुनील कोटकर, शरद चौधरी, रावसाहेब वाळुंज, गोरक्ष मालुंजकर, रमेश आवारी, बाळासाहेब सावंत, रोहिदास जाधव, भाऊसाहेब काळे, भाऊसाहेब रकटे, भरत घाणे, सी डी भांगरे, हितेश कुंभार, निलेश गायकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

बँकेच्या २१ संचालकांच्या जागांसाठी येत्या २० फेबु्रवारीला मतदान होणार आहे. बँंकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बँकेच्या वर्तुळातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीतून मोकळे झालेले तालुका आणि जिल्हास्तरावरील पुढारी आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीत व्यस्त होणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com