एसटी बसमध्ये महिलेच्या पर्समधून गंठण चोरीस

एसटी बसमध्ये महिलेच्या पर्समधून गंठण चोरीस

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

नेवासाफाटा येथे आंबेडकर चौकात बसमध्ये टाकळीभानकडे येण्यासाठी बसमध्ये बसत असलेल्या महिलेच्या पर्समधून सुमारे एक लाख रुपये किमतीचे गंठण अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेवून चोरुन नेल्याची घटना घडली असून याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सुवर्णा संजय लोहकरे (वय 32) धंदा-शिक्षक रा. पिंप्रीचिंचवड यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, मी पिंपरी येथे शिक्षिका म्हणून नोकरीस आहे. 5 मे रोजी टाकळीभान येथे माहेरी येण्यासाठी सकाळी पावणेआठ वाजता बसमधून नेवासाफाटा येथे दुपारी दीड वाजता आले. त्यानंतर आंबेडकर चौकातून गंगापूर-श्रीरामपूर एसटी बसमध्ये बसले. बसमध्ये बसताना माझ्या खांद्याला पर्स लावलेली होती.

त्यापूर्वी पर्समध्ये सोन्याचे सुमारे एक लाख रुपये किमतीचे गंठण होते. बसमध्ये बसल्यावर प्रवासाचे तिकीट घेतल्यावर सहज पर्स चेक केली असता पर्समध्ये गंठण नव्हते. कोणीतरी अज्ञात चोरट्याने पर्सच चैन खोलून गंठण चोरुन नेल्याची खात्री झाली. या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com