महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याचे गंठण लंपास

सावेडीत धूम स्टाईल चोरटे सक्रीय
File Photo
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सण-उत्सवाचे दिवस सुरू होताच सावेडी उपनगरात धूम स्टाईलने दागिने चोरणार्‍या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. मंगळवारी भरदुपारी एका महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याचे मिनी गंठण धूम स्टाईलने ओरबडले. पाईपलाईन रोडवरील बायजाबाई सोसायटीजवळ ही घटना घडली. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रितम प्रसाद भंडारी (वय 36 रा. पाइपलाईन रोड, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे. मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास प्रितम भंडारी व त्यांच्या जाऊबाई माधुरी भंडारी या दोघी घरापासून जवळ असलेल्या एका गिरणीमध्ये पायी जात असताना समोरून दुचाकीवर आलेल्या चोरट्याने प्रितम यांच्या गळ्यातील दीड तोळ्याचे मिनी गंठण ओरबडून एकविरा चौकाकडे धूम ठोकली. प्रितम यांनी आरडाओरडा केल्यानंतर स्थानिक नागरिक जमा झाले. त्यांनी तोफखाना पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com