महिलेच्या गळ्यातील गंठण लांबविले

पाईपलाईन रोडवरील घटना: दोन तोळे लंपास
File Photo
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्याचे सोन्याचे गंठण दुचाकीवरून (Chain Snatching) आलेल्या दोघांनी ओरबडून धूम ठोकली. पाईपलाईन रोडवरील पेट्रोलपंपाजवळ (Pipeline Road) ही घटना घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात (Topkhana Police Station) दोन अज्ञात चोरट्यांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल (Filed a Crime) केला आहे. मनिषा दीपक धोका (रा. वाणीनगर, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे.

मनिषा धोका शुक्रवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास पाईपलाईन रोडवरील (Pipeline Road) पेट्रोलपंपाजवळून जात असताना विना नंबरच्या दुचाकीवरून आलेल्या दोघांनी मनिषा यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण (Gold Chain) ओरबडून भिस्तबाग चौकाच्या दिशेने धूम ठोकली. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस उपअधीक्षक अजित पाटील (Deputy Superintendent of Police Ajit Patil), स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके (LCB PI Anil Katke), तोफखान्याच्या निरीक्षक ज्योती गडकरी (Topkhana PI Jyoti Gadakari), उपनिरीक्षक समाधान सोळुंके (API Samadhan Solunke) यांनी घटनास्थळी भेट दिली.

पुढील तपास सहायक निरीक्षक मुजावर करीत आहे. दरम्यान ऐन सणासुणीच्या काळात सावेडी (Savedi) उपनगरात सोनसाखळी चोरी, पैशाची बॅग चोरी, घरफोडीच्या घटना वाढल्यामुळे पोलिसांसमोर तपासाचे आव्हान उभे राहिले आहे. नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून महिलांनी खरेदीसाठी बाहेर पडल्यानंतर दागिण्यांची काळजी घ्यावी, असे आव्हान पोलिसांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com