दुचाकीवरून प्रवास करणार्‍या महिलेचे गंठण लांबविले

सावेडी उपनगरातील घटना || पोलिसांत गुन्हा
दुचाकीवरून प्रवास करणार्‍या महिलेचे गंठण लांबविले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

दुचाकीवर प्रवास करणार्‍या महिलेच्या गळ्यातील एक तोळ्याचे गंठण धूम स्टाईलने चोरून नेले. मंगळवारी दुपारी पावणे दोन वाजेच्या दरम्यान सावेडी उपनगरातील कुष्ठधाम रोडवर ही घटना घडली. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्पणा महेश कोडम (वय 42 रा. आनंदी बाजार, नगर) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी यांची कुष्ठधाम रोडवर बालाजी कमान शेजारी रमेश केमीकल नावाचे दुकान आहे. फिर्यादी व त्यांचे पती मंगळवारी दुकानावर होते. ते दुकान बंद करून दुचाकीवरून घराकडे जेवण करण्यासाठी जात असताना कुष्ठधामच्या गेटच्या समोर त्यांच्या पाठीमागून दुचाकीवर आलेल्या चोरट्याने फिर्यादीच्या गळ्यातील 10 ग्रॅमचे (एक तोळा) गंठण ओरबडून प्रोफेसर कॉलनी चौकाकडे धूम ठोकली. फिर्यादी व त्यांच्या पतीने आरडाओरडा केला परंतू, चोरटा भरधाव वेगात पसार झाला. घटनेची माहिती तोफखाना पोलिसांना मिळताच एक पथक घटनास्थळी दाखल झाले.

यासंदर्भात कोडम यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com