दिशाभूल करून दुचाकीवरील महिलेचे गंठण ओरबाडले

कोतवालीत गुन्हा दाखल
File Photo
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

दुचाकीवरून प्रवास करणार्‍या महिलेची दिशाभूल करून सव्वा तोळ्याचे मिनी गंठण अज्ञात चोरट्याने लंपास केले. बुधवारी दुपारी पर्वत हॉटेल ते राशिन माता मंदिराच्यादरम्यान महात्मा फुले चौकाकडून सहकार सभागृहाकडे जाणार्‍या रोडवर ही घटना घडली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सपना सुनील पटवा (वय 40 रा. सावी हॉस्पिटलशेजारी, सारसनगर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी व त्यांची भाची बुधवारी दुपारी मोपेड दुचाकीवरून महात्मा फुले चौकाकडून सहकार सभागृहाकडे जात असताना पर्वत हॉटेल ते राशिन माता मंदिराजवळ पाठीमागून आलेला एक दुचाकीस्वार त्यांना म्हणाला,‘साडीचा पदर खाली लटकतोय’, असे म्हटल्याने फिर्यादीने दुचाकी रस्त्याच्या बाजूला थांबवली व पदर नीट करत असताना दुचाकीवरील व्यक्तीने फिर्यादीच्या गळ्यातील सव्वा तोळ्याचे सोन्याचे मिनी गंठण ओरबडले.

फिर्यादी व त्यांची भाची यांनी त्या चोरट्यास विरोध केला असता त्याने त्यांना धक्काबुक्की केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक (नगर शहर) अनिल कातकाडे, पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com