तीन तोळ्याचे गंठण ओरबाडले

बालिकाश्रम रोडवरील घटना, गुन्हा दाखल
तीन तोळ्याचे गंठण ओरबाडले
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

दुचाकीवरून आलेल्या दोघांनी वृद्ध महिलेच्या गळ्यातील तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण ओरबाडून नेले. रविवारी दुपारी बालिकाश्रम रोडवरील बागरोजा हाडको येथील बावर्ची हॉटेलजवळ ही घटना घडली. याप्रकरणी दोन अनोळखी चोरट्यांविरूद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

पुष्पा दत्तात्रय कारमपुरे (वय 65 रा. जाधव मळा, बालिकाश्रम रोड, नगर) यांनी फिर्याद दिली आहे. पुष्पा कारमपुरे या रविवारी दुपारी पावणे बारा वाजेच्या सुमारास बालिकाश्रम रोडवरील बावर्ची हॉटेलजवळून पायी जात असताना दुचाकीवरून वेगात आलेल्या दोन इसमांनी कारमपुरे यांच्याजवळ दुचाकीचा वेग कमी केला. कारमपुरे यांच्या गळ्यातील तीन तोळ्याचे सोन्याचे गंठण ओरबाडून धूम ठोकली. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, एलसीबीचे निरीक्षक अनिल कटके, पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com