महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याचे मंगळसूत्र ओरबाडले

कोतवाली पोलिसांत गुन्हा
महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याचे मंगळसूत्र ओरबाडले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लांबवल्याची घटना शहरातील आयटीआय कॉलेज परिसरात घडली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी 45 हजार रुपयांचे सोन्याचे दीड तोळ्याचे मंगळसूत्र बळजबरीने ओढून तोडून नेले आहे.

या प्रकरणी संगीता नानासाहेब घनवट (वय 48 रा. आयोध्यानगर, केडगाव, अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे. सोमवारी सायंकाळी फिर्यादी घनवट त्यांच्या मैत्रिणीसोबत शहरात खरेदी करण्यासाठी आल्या होत्या. रात्री पावणेनऊच्या दरम्यान आयटीआय कॉलेज परिसरातून जात असताना काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी घनवट यांच्या गळ्यातील दीड तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने ओढून तोडून नेले.

दुचाकी चालविणार्‍या आरोपीने पांढर्‍या रंगाचा शर्ट व डोक्याला पांढर्‍या रंगाचा रुमाल बांधलेला होता. तर पाठीमागे बसलेल्या आरोपीने पांढर्‍या रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट घातलेली होती. पुढील तपास कोतवाली पोलीस करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com