2 लाख 80 हजारांचे गंठण हिसकावून पोबारा

2 लाख 80 हजारांचे गंठण हिसकावून पोबारा
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

समता नगरमधील त्रिमूर्ती मंदिरासमोर एका महिलेच्या गळ्यातील 2 लाख 80 हजार रुपयांचे गंठण दुचाकीवर आलेल्यांनी हिसकावून पोबारा केल्याची घटना शनिवारी सांयकाळी सव्वा सातच्या सुमारास घडली आहे.

याप्रकरणी सुनंदा नवनाथ धुमाळ (वय 55) राहणार शिवांजली बंगला नवले नगर यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. ही चोरी काळ्या रंगाच्या दुचाकीवर आलेल्या दोघांनी केलेली आहे. घटनास्थळी पोलीस उपअधिक्षक संदीप मिटके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अनिल कटके यांनी भेट दिली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com