सोन्याचे गंठण ओरबडून पळालेल्या आरोपीला नागरिकांकडून चोप

चोरटा पोलिसांच्या ताब्यात || एक दिवसांची पोलीस कोठडी
सोन्याचे गंठण ओरबडून पळालेल्या आरोपीला नागरिकांकडून चोप

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

घराच्या दारात उभे असणार्‍या शहरातील ज्येष्ठ नागरीक महिलेच्या गळ्यातील तिन तोळ्याचे सोन्याचे गंठण ओरबडून चोरटा पळाला. त्यानंतर महिलेच्या नातवाने पाठलाग केला. मात्र गर्दीत चोरटा पसार झाला. त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेर्‍यातील माहितीच्या आधारे नागरीकांनी चोर पकडून त्याला चोप दिला. पोलिसांनी वेळीच चोराला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.

दरम्यान, चोरट्याकडुन चोरलेले गंठण हस्तगत करण्यात आले आहे. अतुल विजय रोडी (वय-31) रा.पाथर्डी असे चोरट्याचे नाव आहे. त्याला एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांनी दिले. शहरातील चंद्रकला सुभाषचंद्र भंडारी (वय 60) या घराच्या गेटसमोर उभ्या होत्या.दुपारी अडीच वाजण्याच्या समुारास तेथे एक इसम अचानक आला व त्याने भंडारी यांच्या गळ्यातील सोन्यांचे तीन तोळ्याचे (दिड लाख रुपये किमतीचे) गंठण हिसकावले तो पळाला.

भंडारी यांचा नातू जिवेश याने चोरट्याचा पाठलाग केला. मात्र मेनरोड वरील गर्दीचा फायदा घेवुन चोरटा पळाला.त्यानंतर व्यापारी पेठेतील सर्व व्यापारी व नागरीक जमा आले. सीसीटीव्ही कॅमेर्‍यात हा इसम कैद झाला होता. त्याचा तपास नागरीकांनी केला. त्याला पकडुन चांगला चोपही दिला. पोलिसांनी वेळीच त्याला ताब्यात घेतले.पोलिस उपनिरीक्षक लिमकर व भगवान सानप यांनी चोरट्याला पोलिस ठाण्यात आणले. रोडी यांने चोरलेले गंठण पोलिसांना काढुन दिले आहे. शुक्रवारी न्यायालयासमोर उभे केले असता अतुल रोडी याला एक दिवसाची पोलिस कोठडी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com