शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
शिर्डी (Shirdi) शहरात गंठण चोरी (Chain Snatching) करणार्या आरोपीस (Accused) शिर्डी पोलिसांनी जेरबंद (Shirdi Police Arrested) केले असून त्याच्याकडून दीड लाख रुपये किमतीचे ऐवज हस्तगत केला आहे.
शहरात काही दिवसापूर्वी केलेल्या धुमस्टाईल गुन्ह्यातील तीन गुन्हे दाखल (Crimes Filed) असलेला साहील उर्फ मिंडा पिंपळे (वय 25) रा. अशोकनगर, ता. श्रीरामपूर (Shrirampur) येथील आरोपी औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील वाळुंज पोलीस स्टेशनच्या (Walunj Police Station) कस्टडीमध्ये असताना शिर्डी येथील केलेल्या गुन्ह्यांमध्ये वर्ग करुन नुकताच ताब्यात घेऊन अटक केली असता त्याने केलेल्या तीन गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून जवळपास 25 ग्रॅम वजनाचे तीन मंगळसूत्र अंदाजे किंमत एक लाख 50 हजाराचे सोने जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी दिली. त्याच्यावर शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये (Shirdi Police Station) 3 गुन्हे या अगोदर दाखल आहे.
जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला (SP Rakesh Ola), उपविभागीय अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या शिर्डी येथील दुचाकी व धुमस्टाईल गुन्हेगारांना जेरबंद करण्यासाठी मोहीम सुरु आहे. त्या अनुषंगाने केलेल्या कारवाईत त्यांच्याकडून दिड लाखाचा सोन्याचा ऐवज हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. त्याच्या सहवासात असलेले व त्यास मदत करणारे यांचा देखील शिर्डी पोलिसांनी (Shirdi Police) शोध सुरू केला आहे.
या कारवाईत पोलीस हेड कॉन्स्टेबल संदिप गडाख, नितीन शेलार, अजय अंधारे, राजेंद्र बिरदवडे यांनी भाग घेतला. संशयित गुन्हेगारांची माहिती कोणाला असेल तर अशा संशयित गुन्हेगारांची माहिती शिर्डी पोलिसांना द्यावी. त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी केली आहे.