file photo
file photo
सार्वमत

चांदेकसारेत तीन दिवस कडकडीत बंद

Arvind Arkhade

सोनेवाडी|वार्ताहर|Sonewadi

दिवसात चांदेकसारे येथे पाच करोना बाधित रुग्ण सापडल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु नागरिकांनी घाबरून जाऊ नये सोशल डिस्टन्स पाळावे, मास्क व सँनिटायझरचा चा वापर करावा करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे त्याची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन चांदेकसारेचे केशवराव होन यांनी केले.

तीन संशयित रुग्णांचे रिपोर्ट आल्यानंतर आधीचे दोन व हे तीन असे मिळून पाच करोना पॉझिटिव्ह रुग्ण चांदेकसारेत आढळून आले. त्यांना कोविड सेंटरमध्ये दाखल केले असून त्यांच्यावर उपचार चालू असल्याची माहिती डॉ नितिन बडदे यांनी दिली. गावातील करोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ग्रामपंचायत व प्रशासनाच्या वतीने गाव बंद करण्यासाठी मीटिंग बोलवण्यात आली.

यावेळी केशवराव होन, संचालक आनंदराव चव्हाण, रोहिदास होन, ज्ञानेश्वर होन, डॉ. गोरक्षनाथ रोकडे, सरपंच पुनम खरात, उपसरपंच विजय होन, पोलीस पाटील मीराताई रोकडे, ग्रामविकास अधिकारी प्रल्हाद सुकेकर अदि उपस्थित होते. शनिवार दि 8 ऑगस्ट ते सोमवार दि. 10 ऑगस्ट 2020 पर्यंत संपुर्ण गावात बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com