चांदेकसारे ऐडंकी शिवारात बिबट्याने केली बोकडाची शिकार

चांदेकसारे ऐडंकी शिवारात बिबट्याने केली बोकडाची शिकार

सोनेवाडी |वार्ताहर| Sonewadi

कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे ऐडंकी परिसरात बिबट्याचा वावर गेल्या महिन्यापासून असल्याने नागरिक भयभीत झाले आहे. वस्तीवर राहणार्‍या नागरिकांच्या शेळ्या मेंढ्या कोंबड्या व पाळीव कुत्री या बिबट्याचे शिकार करून फक्त केली आहे.

बिबट्याच्या दहशतीने चांदेकसारे परिसरातील नागरिक भयभीत झाले असून वन विभागाने या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी कल्याण होन यांनी केली आहे.

रविवारी रात्री एक वाजता खरे यांच्या वस्तीवर बिबट्याने हल्ला चढवत बाळासाहेब खरे व संगीता खरे यांच्या समोरून बिबट्याची शिकार करून उसाच्या शेतात फरफटत नेले. रात्री बिबट्याच्या दर्शनाने खरे कुटुंब भयभीत झाले. रात्र कशीबशी काढून सकाळी त्यांनी झालेली घटना शेजारीच असलेले कल्याण होन यांना सांगितली. या अगोदरही या बिबट्याने त्यांच्या पाळीव कुत्र्याची शिकार केली होती.

गेल्या महिन्यापासून या बिबट्याने या वाड्या-वस्त्या वरील नागरिकांच्या पाळीव कोंबड्या कुत्री शेळ्या-मेंढ्या आदींची शिकार केली असल्याचे उघड झाले. कल्याण होन, बाळासाहेब खरे, बाळासाहेब खर्से, मनराज होन, लक्ष्मण होन, आप्पासाहेब होन, धर्मा होन, दादासाहेब होन, चंद्रकांत होन या ऐडंकी परिसरात राहणार्‍या नागरिकांनी या बिबट्याने अनेक वेळा शिकार केली असल्याचे सांगितले.

सदर परिसरात मसोबा वस्ती शाळा असल्याने पालकांच्या मनातही विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी मोठी घबराट निर्माण झाली आहे. या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी कल्याण होन यांनी वन विभागाच्या अधिकार्‍यांशी संपर्क केला असून वन विभागाने त्वरित पिंजरा लावावा, अशी मागणी त्यांच्यासह स्थानिक नागरिकांनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com