चांदेकसारेत डुकरे पकडण्याची मोहीम सुरूच

नागरिकांनी सहकार्य करावे- उपसरपंच विजय होन
चांदेकसारेत डुकरे पकडण्याची मोहीम सुरूच

सोनेवाडी |वार्ताहर| Sonewadi

चांदेकसारे ग्रामपंचायतीने गावात केलेल्या विकासकामे विरोधकांच्या डोळ्यात खुपत आहे. माजी आ. स्नेहलता कोल्हे व युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीमध्ये राजकारण न करता विकासाच्या बाबतीतच निर्णय घेतले जातात. मात्र या ना त्या कारणावरुन ग्रामपंचायतीला बदनाम करण्याचा हेतू विरोधक सोडत नाही ही दुर्दैवी बाब आहे. शेतकरी व गावातील नागरिकांचे नुकसान टाळण्यासाठी दोन महिन्यापासून डुकरे पकडण्याची मोहीम ग्रामपंचायतीने सुरू असल्याची माहिती उपसरपंच विजय होन यांनी दिली आहे.

होन यांनी सांगितले, डुकरांच्या मालकांनीही याकामी ग्रामपंचायतीला सहकार्य केले. 90 टक्के डुकरे पकडण्यात आली असून दहा टक्के डुकरांनी गावातून पळ काढत शेतात आश्रय घेतला आहे. चांदेकसारे पंचकृषीचा शिवार जास्त असल्याने ही डुकरे पकडण्यात डुकरांच्या मालकांना थोड्याश्या समस्या निर्माण होत आहे. मात्र परिसरातील नागरिकांनी ग्रामपंचायतीला सहकार्य करून डुकरांबाबत माहिती दिली तर हे काम सोपे होईल. ग्रामपंचायत प्रशासन हे ग्रामस्था बरोबर असून विरोधकांनी ग्रामपंचायतीवर शिंतोडे उडविण्या आधी ग्रामपंचायतीने केलेल्या कामाची माहिती घेणे गरजेचे आहे असे आवाहन सरपंच पुनम खरात यांनी केले.

माजी सरपंच केशवराव होन यांनी गावात उपद्रव घालत असलेल्या डुकरांच्या बंदोबस्तासाठी डुकरांच्या मालकांना ग्रामपंचायतीत बोलावून डुकरे पकडण्याची सूचना केली होती. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून डुकरे पकडण्यासाठी लागणारी सामुग्री व पकडून आणलेले डुकरे बाहेर सोडण्यासाठी वाहनाची व्यवस्थाही करण्यात आली होती. गावातील डुक्करे पकडण्यात आली असून गावाबाहेर पंचक्रोशीत शेतामध्ये आश्रय घेतलेल्या डुकरांनाही ताबडतोब पकडून शेतकर्‍यांचा त्रास कमी व्हावा यासाठीही ग्रामपंचायतीने डुकरांच्या मालकांना बजावले आहे. ग्रामसेवक पल्लाद सुकेकर यांनी ग्रामस्थ व शेतकर्‍याना आवाहन केले आहे की आपल्याला डुकरे व वन्य प्राण्यापासून तो त्रास होतो त्याची दखल ग्रामपंचायत घेणार आहे. उपद्रव घालणार्‍या डुकरांचा बंदोबस्त ग्रामपंचायत करत असल्याचे विजय होन यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com