सीईओ क्षीरसागर झाले मुख्य सचिवांचे सहसचिव

दीड वर्षात झाली मुंबईला बदली
CEO राजेंद्र क्षीरसागर
CEO राजेंद्र क्षीरसागर

अहमदनगर (प्रतिनिधी)

जिल्हा परिषदेचे (ZP) कर्तव्यदर्शक मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर (CEO Rajendra Kshirsagar) यांची गुरूवारी मुंबईला मंत्रालयात (Mumbai Mantralaya) बदली झाली आहे.

आयएएस (IAS Rajendra Kshirsagar) असणारे क्षीरसागर हे आता राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्त यांच्या कार्यालयात सहसचिव म्हणून काम करणार आहेत. या पदाच्या माध्यमातून क्षीरसागर हे राज्याचे काम हाकणार आहेत.

साधारणपणे दीड वर्षापूर्वी म्हणजेच 23 ऑक्टोबर 2020 ला क्षीरसागर यांची नगर जिल्हा परिषदेत (Ahmednagar ZP) मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर बदली झाली होती. कडक, शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ते जिल्हा परिषद आणि प्रशासनात परिचित अधिकारी होते. त्यांच्या दीड वर्षाच्या कार्यकाळात जिल्ह्यात करोनाच्या दुसर्‍या लाटेत मोठे काम झाले. यासह घरकुल योजना, जलजीवन मिशन या योजनांनी मोठी गती घेतली होती.

स्पष्ट वक्ता अशी त्यांची ओळख होती. येत्या 20 मार्चला विद्यमान पदाधिकारी यांची मुदत संपल्यानंतर 21 मार्चपासून क्षीरसागर यांची प्रशासक म्हणून नियुक्ती होणार होती. याची मोठी धास्ती अनेकांनी घेतली होती.

पुढील आठवड्यात मुख्य कार्यकारी अधिकारी क्षीरसागर हे आपला पदभार सोडणार आहेत. दरम्यान, नगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अद्याप कोणाची नियुक्त झालेली नाही.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com