जिल्ह्यातील 'या' साखर कारखान्याची केंद्रीय पथकाकडून चौकशी;  ईडी की आयकर विभाग?

जिल्ह्यातील 'या' साखर कारखान्याची केंद्रीय पथकाकडून चौकशी; ईडी की आयकर विभाग?

कारखाना परिसरात शुकशुकाट

कर्जत l Karjat

कर्जत (Karjat) तालुक्यातील बारडगाव सुद्रिक येथील श्री अंबालिका शुगर या खाजगी साखर कारखान्यावर (Shri Ambalika Sugar Factory) केंद्रीय तपास पथकाने (Central Investigation Team) आज सकाळपासून चौकशी सुरू केली आहे.

आज सकाळी सहा वाजेपासून ही चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. या पथकाकडून कारखान्याचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहे. या भागात केंद्रीय सुरक्षा दलाचे पथक तैनात करण्यात आलेले आहे.

पथकाच्या चार ते पाच चारचाकी गाड्या असलेल्या आहेत. या पथकाकडून काही कर्मचाऱ्यांचे मोबाईल ताब्यात घेण्यात आल्याचे समजते. मात्र ही चौकशी ईडी (ED) की आयकर विभागाकडून (Income Tax) केली जात आहे याबाबत अद्याप स्पष्ट होत नाही. कारखाना परिसरात शुकशुकाट असून यावर बोलायला कोणी तयार नाही.

Related Stories

No stories found.