मध्य रेल्वेच्या प्रवासी सल्लागार समितीवर श्रीगोड व फोफळे यांची नियुक्ती
सार्वमत

मध्य रेल्वेच्या प्रवासी सल्लागार समितीवर श्रीगोड व फोफळे यांची नियुक्ती

Arvind Arkhade

श्रीरामपूर|प्रतिनिधी|Shrirampur

येथील मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष विशाल पोफळे व प्रवासी संघटनेचे अध्यक्ष रणजीत श्रीगोड यांची मध्य रेल्वे सोलापूर विभाग प्रवासी सल्लागार समितीवर रेल्वे प्रशासनाने नियुक्ती केली आहे. नियुक्तीचे पत्र सोलापूर विभाग मध्य रेल्वेचे वाणिज्य विभाग प्रबंधक प्रदीप हिरडे यांनी दिले असून ही नियुक्ती दोन वर्षांसाठी आहे.

विशाल पोफळे हे बांधकाम व विमा व्यावसायीक असून मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष तसेच महेश पतसंस्थेचे माजी संचालक आहेत.

रणजीत श्रीगोड हे श्रीरामपूर प्रवासी संघटना व प्रवासी महासंघाचे राज्याध्यक्ष असून त्यांनी यापूर्वी मध्य रेल्वे मुंबई प्रवासी सल्लागार झोनल समिती व सोलापूर विभाग प्रवासी सल्लागार समितीचे अनेक वर्षे सदस्य होते. ते हिंद सेवा मंडळ या शिक्षण संस्थेचे सदस्य आहेत.

या निवडीबद्दल दोघांचे व्यापारी व प्रवासी क्षेत्रात अभिनंदन होत आहे. सोलापूर विभाग प्रवासी सल्लागार समितीची मिटींग 13 ऑगस्टला झुमवर होणार असून रेल्वे संदर्भात असलेले प्रश्न व अडचणी बाबत संपर्क साधावा, असेही आवाहन श्रीगोड व पोफळे यांनी केले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com