अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय राज्य मंत्री ना. रामदास आठवले यांच्या 27 व 28 डिसेंबर रोजी नगर जिल्हा दौर्याच्या पार्श्वभूमीवर

रेल्वे स्टेशन येथील भीमराज बुध्दविहार येथे बैठक पार पडली. यामध्ये ना. आठवले यांच्या नियोजित दौर्याचे नियोजन करण्यात आले.

जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या या बैठकीस युवक शहराध्यक्ष अमित काळे, युवक जिल्हाध्यक्ष अशोक केदारे, संजय कांबळे, विजय भांबळ, पाथर्डी तालुकाध्यक्ष बाबा राजगुरू, राज्य संघटक मराठा आघाडी सिद्धार्थ सीसोदे, महिला जिल्हाध्यक्षा आरती बडेकर, अविनाश भोसले, दीपक गायकवाड, विशाल कांबळे, मंगेश मोकळ, महादेव भिंगारदिवे, प्रविण वाघमारे, राहुल गायकवाड, विशाल साबळे, सुशिल साळवे, विवेक भिंगारदिवे, प्रविण चाबुकस्वार, राजू जगताप आदींसह आरपीआयचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.