केंद्रीय आरोग्य पथक नगरात
सार्वमत

केंद्रीय आरोग्य पथक नगरात

जिल्हा रूग्णालयाची केली पाहणी

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

करोनाग्रस्तांचा वाढता आकडा अन् प्रशासनाच्या सुविधांची पाहणी करण्याकरीता केंद्रीय पथक आज नगरात आले. हे पथक आज नगर मुक्कामी थांबणार असून उद्याही पाहणी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पथकाने आज जिल्हा रूग्णालयाला भेट देत तेथील सुविधेची पाहणी केली. त्यानंतर सिव्हील सर्जनकडून जिल्ह्याची परिस्थिती जाणून घेतली. दोन आयएस दर्जाच्या अधिकार्‍यांसह चौघांचा पथकात समावेश आहे. हे पथक नगरची पाहणी केल्यानंतर केंद्र व राज्य शासनाला रिपोर्ट सादर करणार आहेत. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात हे पथक पाहणी करून आले. नगर जिल्ह्यात आज सोमवारी आले.

Deshdoot
www.deshdoot.com