केंद्राकडून रस्ते विकासासाठी 84 कोटी 76 लाखांचा निधी

केंद्राकडून रस्ते विकासासाठी 84 कोटी 76 लाखांचा निधी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने जिल्ह्यातील रस्त्यांच्या विकासासाठी 84 कोटी 76 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला असल्याची माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना खा. डॉ. विखे पाटील म्हणाले, जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील सोनगाव ते चांदेगाव रोड साठी 4कोटी 91 लाख, खरशिंदें ते मांजरी रोडसाठी 3 कोटी 94 लाख, वरशिंदे ताराबद ते मांजरी रस्त्यासाठी 2 कोटी 73 लाख असे 11 कोटी 59 लाख रुपयांचा निधी रस्त्यांच्या कामासाठी मंजूर झाला. शेवगाव तालुक्यातील खानापूर ते ठाकूर निमगाव रोड साठी 2 कोटी 73 लाख, पाथर्डी तालुक्यातील धमनगाव,

मढी ते कोरडगाव, मालेगाव रस्त्यासाठी 12 कोटी 88 लाख, पारनेर तालुक्यासाठी गोरेगाव, डीसाळ, लोणी हवेली, शहांनजापूर, सुपा रस्त्यासाठी 3 कोटी 98 लाख, कर्जत तालुक्यातील अरणगाव, वाळकी, देऊळगाव, खांडवी, रुईगव्हान, कुलधरण, बरडगावन सुद्रीक ते राज्य महामार्ग 54 रस्त्यांसाठी 3 कोटी 95 लाख, श्रीगोंदा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग 161 ते काष्टी, मांडवगणच्या रस्त्यासाठी 12 कोटी 65 लाख असे एकूण 84 कोटी 76 लाख रुपयाचे निधी मंजूर झाला असलयाचे खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले.

केंद्र सरकारने जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गसाठी भरपूर निधी उपलब्ध करुन दिल्यामुळे जिल्ह्यातील जनतेच्यावतीने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे आभार व्यक्त करतो. जिल्ह्यातील प्रत्येक वाडी-वस्तीपर्यंत पोहोचेल असे देखील खा. डॉ. सुजय विखे पाटील यावेळी म्हणाले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com