केंद्र सरकार इथेनॉलचे दर वाढविण्याच्या विचारात
सार्वमत

केंद्र सरकार इथेनॉलचे दर वाढविण्याच्या विचारात

sukhdev fulari

sukhdev fulari

नेवासा|तालुका प्रतिनिधी|Newasa

साखर उद्योगाला दिलासा देयासाठी केंद्र सरकार इथेनॉलचे प्रति लिटरचे दर वाढविण्याचे विचार करीत असून सी-हेव्ही मोलॅसेसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलचा सध्या असलेला 43.75 दर वरून प्रति लिटर 45 रुपये तर बी-हेव्ही मोलॅसेसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलचा सध्या असलेला 54.27 दर वरून प्रति लिटर 57 रुपये करण्याचे संकेत आहेत.

इथेनॉलच्या किंमती वाढविण्याचा प्रस्ताव केंद्रीय कॅबिनेट मंत्री समितीकडे लवकरच सादर होण्याची शक्यता आहे.केंद्रीय अन्न मंत्रालयाचे सहसचिव सुबोधकुमार सिंग यांकग्याकडून इथेनॉल दराचा आढावा घेतला जात आहे.

केंद्रीय अन्न मंत्री रामविलास पासवान यांचा हिरवा कंदील मिळाल्यानंतर हा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी अध्यक्ष असलेल्या केंद्रीय कॅबिनेटच्या अर्थव्यवहार समितीकडे पाठविला जाईल.त्यामुळे इथेनॉल दर वाढीचे भवितव्य हे पंतप्रधान मोदींच्या निर्णयावर अवलंबून राहणार आहे.

पेट्रोल मधील इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण सध्या 10 टक्क्यापर्यंत करण्यास मान्यता आहे.पुढील 2030 पर्यंत हे प्रमाण 20 टक्क्या पर्यंत नेण्याचे केंद्र सरकारचे ध्येय आहे.त्यामुळे इथेनॉलला समाधान कारक दर न मिळाल्यास सरकारचे हे ध्येय पूर्ण होऊ शकणार नाही.काही दिवसांपूर्वी केंद्र सरकार साखरेची किमान विक्री किंमत 3100 रुपये प्रति क्विंटल वरून 3300 रुपयावर नेत आहे.आता इथेनॉलचे दर वाढल्यास साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com