केंद्र सरकारच्या पुतळ्याचे दहन करत महागाईविरोधात निदर्शने

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शेवगावच्या क्रांती चौकात आंदोलन
केंद्र सरकारच्या पुतळ्याचे दहन करत महागाईविरोधात निदर्शने

शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने (CPI) महागाईच्या विरोधात (Against inflation), तसेच केंद्र सरकार महागाई (Central Government Inflation) रोखण्यासाठी अपयशी ठरल्याबद्दल आणि महागाई कमी व्हावी म्हणून येथील क्रांती चौकात आंदोलन करून निदर्शने करण्यात आली.

राज्यात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत. तेल (Oil), डाळी (Dal), अन्न धान्य (Food Grains) व इतर जीवनावश्यक वस्तू खरेदी करणे गोरगरीब जनतेच्या आवाक्याबाहेर गेलेले आहे. सर्व महागाईचे (Inflation) मूळ देशात पेट्रोल (Petrol) व डिझेलच्या (Diesel) वाढलेल्या प्रचंड किमती व मोदी सरकारची जनविरोधी धोरणे आहेत. पेट्रोल, डिझेलवरील कर हे सरकारने आर्थिक बजेटचा मुख्य स्रोत बनवल्याचा परिणाम आहे. डिझेल 96 रुपये तर पेट्रोल 108 रुपयांच्या आसपास झाले आहे. या किमतीत सरकारच्या कराचा वाटा 40 ते 45 टक्क्यांपर्यंत आहे. मार्च 2020 मधे किमती घटत असताना त्याचा लाभ ग्राहकांना देण्याऐवजी 13 ते 16 रुपये अबकारी करात वाढ करून जनतेला लाभापासून वंचित ठेवले.

डिसेंबर 2020 अखेर केंद्र सरकारने इंधनावरील करापोटी (Central government levies tax on fuel) 5 लाख 25 हजार कोटींची कमाई करून जनतेच्या पैशावर दिवसा ढवळ्या दरोडा घातला आहे. करोना काळात आरोग्य व्यवस्थेवर मोठा खर्च (Expenses) होत असल्यामुळे दर कमी करता येणार नाही असे पेट्रोलियम मंत्री सांगतात. 35 हजार कोटी लसीकरणासाठी दिले असतानाही चक्क मंत्री खोटे बोलून जनतेची दिशाभूल करत आहे. वाढत्या इंधन दरामुळे अन्न धान्य व जीवनाश्यक वस्तुंची वाहतूक महाग झाल्याने सर्वच वस्तू महाग झाल्या आहेत. त्याच्या झळा मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य जनतेला बसत आहेत. स्वयंपाकाचा गॅस महाग झाला आहे.

450 रुपये सिलेंडर 860 रुपयांना झाला आहे. त्यामुळे जनतेचे आर्थिक बजेट कोलमडले (financial budget of the people collapsed) आहे. आंदोलनात कॉ. सुभाष लांडे, कॉ. संजय नांगरे, कॉ. बापुराव राशीनकर, कॉ. राम पोटफोडे, कॉ. आत्माराम देवढे, कॉ. भगवान गायकवाड, कॉ. सय्यद बाबुलाल, कॉ.क्रांती मगर, अजहर पिंजारी, रविंद्र लांडे, अमोल तुजारे, कॉ. सुरेश मगर, जय मगर,दीपक गारोळे आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com