साईबाबांचा शतकोत्तर रौप्यमहोत्सवी रामनवमी उत्सव ऐतिहासिक ठरणार

यात्रा कमिटी अध्यक्षपदी कमलाकर कोते यांची बिनविरोध निवड
साईबाबांचा शतकोत्तर रौप्यमहोत्सवी रामनवमी उत्सव ऐतिहासिक ठरणार

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

सर्वधर्माचे प्रतिक असलेल्या शिर्डी श्री साईबाबांंच्या रामनवमी उत्सव यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदी कमलाकर कोते यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली असून यंदाच्या वर्षी रामनवमी उत्सवास सव्वाशे वर्षे पूर्ण होत असल्याने शतकोत्तर रौप्यमहोत्सवी रामनवमी उत्सव ऐतिहासिक ठरणार असल्याचा विश्वास नवनियुक्त अध्यक्ष कमलाकर कोते यांनी व्यक्त केला.

शिर्डी येथील श्री साईबाबांच्या रामनवमी उत्सवासाठी देशविदेशातून लाखो भाविक येत असतात.रामनवमी उत्सवास 1897 मध्ये सुरुवात करण्यात आली. 10 मार्च 2022 मध्ये साजरी होणार्‍या रामनवमी उत्सवाचे यंदाचे हे 125 वे वर्ष आहे. तीन दिवसीय सुरू असणारा हा अभूतपूर्व सोहळा पंचक्रोशीतील नागरिकांसाठी मोठी पर्वणी असते. त्यातच मागील दोन वर्षांपासून कोविडच्या प्रादूर्भावामुळे रामनवमी यात्रा रद्द करण्यात आली होती. मात्र देशात कोविडची लाट ओसरल्यानंतर सरकारने कोविडचे सर्व नियम, अटी, शर्ती शिथिल केल्या आहेत. त्यामुळे यंदाचा रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

शिर्डी ग्रामस्थांच्यावतीने बुधवार दि. 23 रोजी यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदासाठी सर्वपक्षीय ग्रामस्थांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत कैलासबापू कोते, दिगंबर कोते, भानुदास गोंदकर, ज्ञानेश्वर गोंदकर, मधुकर कोते, रमेश गोंदकर, तुकाराम गोंदकर, केशव गायके, अभय शेळके, शिवाजी गोंदकर, महेंद्र शेळके, सुधाकर शिंदे, आप्पासाहेब कोते, विनायक कोते, हौशीराम कोते, प्रताप जगताप, देवराम सजन, प्रमोद नागरे, वसंतराव शेळके, यशवंतराव गायके, बाबासाहेब कोते, दादासाहेब गोंदकर, विजयराव कोते, निलेश कोते, नितीन शेळके, नानासाहेब काटकर, डॉ. एकनाथ गोंदकर, अ‍ॅड. अनिल शेजवळ, अ‍ॅड. अविनाश शेजवळ, सलीम शेख, मंगेश त्रिभुवन, नवनाथ कोते, संदीप पारख, राजेंद्र शिंदे, अजित पारख, अशोकराव कोते, जितेंद्र शेळके, संजय त्रिभुवन, उत्तम कोते, राजेंद्र कोते, दिनकर कोते, विकास कोते, प्रमोद गोंदकर, अविनाश गोंदकर, दत्तात्रय कोते, नितीन कोते, सचिन तांबे, विजय कोते, अरविंद कोते, ताराचंद कोते, गणेश गोंदकर, जगन्नाथ गोंदकर, सुजित गोंदकर, साईराम गोंदकर, विकास गोंदकर, महेश गोंदकर, नंदू कोते, संजय गोंदकर, किरण गोंदकर, गणेश कोते, राकेश कोते, साई गोंदकर, किरण कोते, किरण बर्डे, अमोल गायके, सचिन कोते, देवानंद शेजवळ, नानासाहेब शिंदे, सुनील परदेशी, मनीलाल पटेल, तुषार गोंदकर, राजेंद्र गोंदकर, शफिक शेख, अमोल कोते, धनंजय आठरे, रवींद्र कोते, समीर शेख, युनूस शेख, सुनील गोंदकर, महेश महाले, राहुल गोंदकर, जयराम कांदळकर, सुनील बारहाते, अनिल पवार, चंद्रकांत गायकवाड, मच्छिंद्र गायके, रवींद्र सोनवणे, बाबूभाई शेख, सचिन औटी,अजय कोते, सोपान कोते,चेतन कोते, साहिल शेख, अनिल कोते, साई कोते, प्रमोद गायके आदी उपस्थित होते.

यावेळी यात्रेत प्रामुख्याने बैलगाडा शर्यत, भव्य साईकेसरी कुस्ती स्पर्धा, फूड फेस्टिव्हल, सुप्रसिद्ध लावण्या, तमाशा, नाटक,ऑर्केस्टा, एक एकर जागेत लक्षवेधी अशी श्री साईबाबांच्या प्रतिमेची रांगोळी, शिर्डी गावातील सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणार्‍या अधिकार्‍यांना साईरत्न पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

यंदाच्या ऐतिहासिक यात्रेत सर्व जातीधर्माच्या नागरिकांना बरोबर घेऊन सबका मालिक एक हा संदेश जगभरात पोहचवणार असल्याचे सांगत या ऐतिहासिक शतकोत्तर रौप्यमहोत्सवी रामनवमी उत्सव कमीटीच्या अध्यक्षपदी माझी सर्वाच्या सहकार्याने बिनविरोध निवड झाली हे आमच्या परिवाराचे भाग्य असल्याचे कमलाकर कोते यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com