नेवासा
नेवासा
सार्वमत

नेवासा - मोजक्या भविकांसह पहाटे अभिषेक करून महापूजा संपन्न

नंदकिशोर महाराज खरात यांच्यासह पत्नी सौ. वर्षा खरात व अंबादास भागवत व सौ.प्रयागाबाई भागवत या दोन जोडयाना महापूजेचा मान मिळाला.

Nilesh Jadhav

नेवासा (तालुका वार्ताहर) - नेवासा येथे संत ज्ञानेश्वर मंदिरामध्ये देवषयनी आषाढी एकादशी निमित्त मोजक्या भविकांसह आज पहाटे अभिषेक करून महापूजा संपन्न झाली. यावेळी नंदकिशोर महाराज खरात यांच्यासह पत्नी सौ. वर्षा खरात व अंबादास भागवत व सौ.प्रयागाबाई भागवत या दोन जोडयाना महापूजेचा मान मिळाला. करोनाच्या पाश्वभूमीवर ज्ञानेश्वर मंदिरामध्ये शुकशुकाट बघायला मिळाला. इतर वेळी एकादशीला लाखो भाविकांच्या उपस्थिती असते पण आज करोना मुळे सगळे मंदिर बंद असल्याने भाविक आले नाहीत.

ज्ञानेश्वर मंदिराचे हभप देशमुख महाराज म्हणाले की ज्या भक्तांना पंढरपूरला जाता येत नाही ते श्री क्षेत्र नेवासा येथे वारीला येतात परंतु कोरोना प्रादुर्भावामुळे सर्व वारकरी भाविकांनी आपआपल्या घरून मनातून माऊलींचे दर्शन घ्यावे. यावेळी ज्ञानेश्वर मंदिराचे विश्वस्त रामभाऊ जगताप, ज्ञानेश्वर माऊली शिंदे, भवार गुरुजी यांच्यासह मंदिर कर्मचारी उपस्थित होते.

नेवासा येथे संत ज्ञानेश्वर मंदिरामध्ये देवषयनी आषाढी एकादशी निमित्त मोजक्या भविकांसह आज पहाटे अभिषेक करून महापूजा संपन्न झाली.

Posted by Daily Sarvmat on Tuesday, June 30, 2020
Deshdoot
www.deshdoot.com