राहाता शहरात वृक्षांचा पाचवा वाढदिवस उत्साहात साजरा

राहाता शहरात वृक्षांचा पाचवा वाढदिवस उत्साहात साजरा

राहाता | वार्ताहार

राहाता (Rahata) येथील साई योगा फाऊंडेशनने (Sai Yoga Foundation) लावलेल्या वृक्षांचा पाचवा वाढदिवस (Tree Birthday) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राहाता पंचायत समितीच्या (Rahata Panchayat Samiti) अधिकारी व कर्मचारी यांच्या निवासस्थानात समोर साई योगा फाउंडेशनने वृक्षांना फुगे व फुलांनी सजवून लहान बालकांच्या हस्ते केक (Cake) कापून आगळावेगळा वृक्षांचा पाचवा वाढदिवस साजरा केला.

या वेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे डॉ पी जी.गुंजाळ, डॉ राजेंद्र पिपाडा, गटनेते विजय सदाफळ, शरद निमसे, डॉ स्वाधीन गाडेकर, राहाता प्रेस क्लबचे अध्यक्ष रामकृष्ण लोंढे, नगरसेविका अनुराधा तुपे, सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे, किरण वाबळे साई योगा फाउंडेशनचे अध्यक्ष बापूसाहेब पानगव्हाणे, नागेश गायकवाड हे उपस्थित होते. राहाता शहरात योगा फाउंडेशनच्या माध्यमातून दररोज पहाटे योगा प्राणायामाचे धडे नागरिकांना दिले जातात. शहरात स्वच्छता मोहिमेचे आयोजन करून नागरिकांना स्वच्छता महत्व पटवून देण्याचे काम फाउंडेश सातत्याने करत आहे.

गेल्या पाच वर्षापासून दोन हजार पेक्षा जास्त वृक्ष लागवड करून टॅंकरने पाणी देऊन त्यांचे संगोपन केले आहे. प्रत्येक रविवारी सायकल फेरीद्वारे शहरापासून जवळ असलेल्या विविध गावांमध्ये वृक्षारोपणाचे आयोजन. असे विविध सामाजिक उपक्रम फाउंडेशन च्या माध्यमातून राबवले जातात. शहरांमध्ये लावलेल् झाडांचा प्रत्येक वर्षी आगळावेगळा वाढदिवस साजरा केला जातो. यावर्षी पाचवा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वृक्षांमुळे राहाता शहर निसर्गाने नटलेले आहे. या उपकरणाचे अनुकरण इतर गावांमध्ये होत आहे.

करोनामुळे (COVID19) आपल्या सर्वांना ऑक्सिजनचे (Oxygen) महत्त्व कळाले. पैसे मोजूनही अनेक रुग्णांना ऑक्सिजन मिळाले नाही. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड व संवर्धन (Tree planting and conservation)करणे खूप महत्त्वाचे आहे. प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन केले पाहिजे.

डॉ. बापूसाहेब पानगव्हाणे (अध्यक्ष साईयोग फाउंडेशन राहाता)

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेंद्र फंड, विनोद गाडेकर, सुरेश भिंगारदिवे ,दीपक दंडवते, गोरख दंडवते डॉ जय उबाळे ,रवींद्र जेजुरकर, राजेंद्र वायकर ,रमेश बनकर, बाळासाहेब गाडेकर. यांच्यासह साईयोगा फाऊंडेशनच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com