सीसीटीव्ही कॅमेरे बंद करुन वसुली अधिकार्‍याचाच सोन्यावर डल्ला

लॉकरमधील 114 तोळे दागिण्यांची चोरी
सीसीटीव्ही कॅमेरे बंद करुन वसुली अधिकार्‍याचाच सोन्यावर डल्ला

घारगाव |वार्ताहर| Ghargav

बेल्हे (ता. जुन्नर) (Belhe) येथील वैष्णवी मल्टिस्टेट अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या (Vaishnavi Multistate Urban Co-operative Credit Society) लॉकरमध्ये नागरिकांनी तारण ठेवलेल्या 51 लाख 21 हजार रुपये किमतीच्या 114 तोळे सोन्यावर (Gold) सोसायटीच्याच वसुली अधिकार्‍याने (Recovery Officer) डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विकास शांताराम खिलारी (वय 41) असे कर्मचार्‍याचे नाव असून आळेफाटा पोलिसांनी (Alephata Police) त्याच्या मुसक्या आवळल्या आहे. सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV Camera) बंद करून सोने गायब केल्याचे पोलीस (Police) तपासात समोर आले आहे.

याबाबत आळेफाटा पोलिसांनी (Alephata Police) दिलेली अधिक माहिती अशी की, बेल्हे येथील वैष्णवी मल्टिस्टेट अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे वसुली अधिकारी व क्लार्कचे काम करणारे कर्मचारी विकास शांताराम खिल्लारी (रा. बेल्हे) यांनी सीसीटीव्ही डीव्हीआर बंद करून या सोन्याची चोरी (Theft of Gold) केली.

लॉकरमध्ये (Locker) अक्षय वसंत जगताप यांनी तारण ठेवलेले 27 तोळे 780 मिली ग्रॅम, महेंद्र बबन जगताप यांचे 5 तोळे 448 मिली ग्रॅम, हारून बाबुभाई बेपारी यांचे 5 तोळे 998 मिली ग्रॅम, राहुल वसंत जगताप यांचे 4 तोळे 500 मिली ग्रॅम, जाफर अहमद पठाण यांचे 11 तोळे 240 मिली ग्रॅम, हारून बाबू भाई बेपारी यांचे 15 तोळे 599 मिली ग्रॅम, सद्दाम रफिक बेपारी यांचे 8 तोळे 815 मिली ग्रॅम, सुनंदा नामदेव नलावडे यांचे 14 तोळे 34 मिली व 11 तोळे 104 ग्रॅम वजनाचे सोने दागिने असे एकूण 51 लाख 21 हजार रुपये किमतीच्या 114 तोळे सोन्याची चोरी केली.

याबाबत शाखा व्यवस्थापक विनोद दत्तात्रेय महाडिक यांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात (Alephata Police Station) फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी वसुली अधिकारी विकास खिलारी याच्या विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे. अधिक तपास आळेफाटा पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर हे करत आहे. वसुली अधिकार्‍याकडे लॉकरच्या चाव्या आल्या कशा? त्याला अजून कोणी साथीदार आहे का? याचा शोध पोलीस घेत आहे.

वैष्णवी मल्टिस्टेट अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या लॉकरमध्ये गहाण सोने सोडविण्यासाठी नागरिक आल्यानंतर लॉकरची चावी गहाळ झाल्याचे व्यवस्थापकांच्या लक्षात आले. तिजोरी खोलण्यासाठी सबंधित कर्मचारी आला असता लॉकरमधील सर्व सोने गायब आल्याचे लक्षात आले. नंतर पोलिसांना कळवण्यात आले.

वैष्णवी मल्टिस्टेट अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या लॉकरमधून तारण 114 तोळे सोने चोरी केल्या प्रकरणी वसुली अधिकारी विकास शांताराम खिलारी यास न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. पाच दिवसात त्याला चोरीसाठी अजून कोणी मदत केली. त्याने चोरलेल्या सोन्याचे काय केले याचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com