<p>अहमदनगर|Ahmedagar</p><p>कोयता, लोखंडी रॉड, लाकडी दांडके, मिरची पुड घेऊन दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली पाच जणांची टोळी कोतवाली पोलिसांनी बुधवारी पहाटे नगर शहरातील कायनेटीक चौकात पाठलाग करून पकडली. </p>.<p>समीर ख्याजा शेख (वय- 23 रा. झरेकर गल्ली, नालेगाव), विशाल राजेंद्र भंडारी (वय- 19 रा. चिपाडे मळा, सारसनगर), परवेज मेहमूद सय्यद (वय- 19 रा. भोसले आखाडा), प्रतिक अर्जुन गर्जे (वय- 22 रा. भगवान बाबा चौक), अमोल संजय चांदणे (वय- 19 रा. चिपाडे मळा, सारसनगर) असे पकडण्यात आलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. तर खाल्या ऊर्फ खलिद मन्सूर शेख (रा. काळे गल्ली, भोसले आखाडा) व एक अनोळखी इसम पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.</p><p>पोलीस शिपाई तानाजी पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सर्व आरोपींविरूद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात भादंवि 399, 402 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पकडलेल्या आरोपींकडून दरोड्याच्या साहित्यासह तीन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली टोळी बाबत कोतवाली पोलिसांच्या गस्ती पथकाला गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे, पोलीस कर्मचारी, तानाजी पवार, सुजय हिवाळे, गवळी, टकले, इंगळे यांच्या पथकाने कायनेटीक चौकात सापळा लावला. तीन दुचाकीवरून आलेल्या सात संशयितांकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून त्यातील पाच जण पकडले. शहर पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिसांनी ही कारवाई केली.</p>