24 गोवंश जनावरांची निर्दयपणे वाहतूक करणारे दोन टेम्पो पकडले

खडकाफाटा टोलनाक्यानजिक 20 लाखाचा मुद्देमाल जप्त; दोघांना अटक
24 गोवंश जनावरांची निर्दयपणे वाहतूक करणारे दोन टेम्पो पकडले

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

नेवासा पोलिसांनी खडकाफाटा टोलनाक्यानजीक दोन वाहनांतून दाटीवाटीने 24 गोवंश जनावरे निर्दयपणे दाटीवाटीने भरुन वाहतूक करताना मिळून आल्याने दोघाांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलीस कॉन्स्टेबल गणेश गलधर यांनी फिर्याद दिली असून त्यावरुन सय्यद जेऊरअली अश्पतअली रा.वाळुंज ता. गंगापूर जि. औरंगाबाद व मोहम्मद रफिक मोहम्मद हनीफ (रा. औरंगाबाद) यांच्या गुन्हा दाखल केला आहे. एमएच 20 एएल 8773 या टेम्पोमधून 16 गोवंश जनावरे दाटीवाटीने भरुन तर एमएच 20 एएल 7395 या टेम्पोमधून 8 गोवंश जनावरे दाटीवाटीने भरुन हे दोघे टेम्पो चालक अहमदनगरहून औरंगाबादकडे ही जनावरे घेवून जात असताना खडका फाटा टोलनाक्याजवळ वाहने अडवून जनावरांची सुटका करण्यात आली.

टेम्पोमध्ये एकूण 18 संकरीत गायी, दोन खिलारी गायी, दोन वासरे व दोन बैल अशी 3 लाख 3 हजार 500 रुपये किंमतीची गोवंश जनावरे होती. साडेअकरा लाख रुपये किंमतीचा आयशर टेम्पो तसेच पाच लाख रुपये किंमतीचा अशोक लेलंड टेम्पो या दोन वाहनातून ही 24 जनावरे जप्त करण्यात आली. जनावरे व टेम्पो मिळून 19 लाख 53 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या दोघांवर प्राणी संरक्षण सुधारीत अधिनियम 1995 चे कलम 5(ब) (क) प्रमाणे तसेच प्राण्यांस क्रूरतेने वागविणे प्रतिबंध अधिनियिम 1960 चे कलम 11 प्रमाणे दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक श्री. दहिफळे करत आहेत.

Related Stories

No stories found.