बिबट्याला पकडण्यासाठी यादववस्ती परिसरात वन विभागाकडून बसविला पिंजरा

बिबट्याला पकडण्यासाठी यादववस्ती परिसरात वन विभागाकडून बसविला पिंजरा

वडाळा महादेव |वार्ताहर| Vadala Mahadev

येथील आरटीओ कार्यालय परिसरात पंधरा ते वीस दिवसांपासून वावरत असलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी वनाधिकारी श्री. लांडे यांनी परिसरातून पिंजरा उपलब्ध करून यादववस्ती येथे पाटाच्या कडेला पिंजरा बसविला.

श्रीरामपूर येथील हरेगाव रोड परिसरातील आरटीओ कार्यालयलगत पंधरा ते वीस दिवसांपासून बिबट्याने थैमान घातले होते. यावेळी येथील गौरव यादव यांनी वेळोवेळी प्रशासनाशी संपर्क साधून बिबट्याविषयी माहिती दिली. या कालावधीत बिबट्याकडून पाळीव कुत्र्याचा फडशा पाडण्यात आला. तसेच वेळोवेळी अधूनमधून बिबट्या परिसरातील नागरिकांना दर्शन देत होता. अनेक दिवसांपासून सदर बिबट्याचे परिसरातील पंपरूम येथे वास्तव्य असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी वेळोवेळी वन अधिकारी कर्मचारी यांच्याशी संपर्क साधत पिंजरा बसविण्याविषयी वेळोवेळी मागणी करत होते. याच मागणीला वनविभागाकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याने परिसरातील नागरिकांनी तसेच गौरव यादव यांनी बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता.

या पार्श्वभुमीवर येथील वनाधिकारी श्री. लांडे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून परिसरातून पिंजरा उपलब्ध करून यादववस्ती येथे पाटाच्याकडेला पिंजरा बसविण्यात आला. सदर पिंजर्‍यामध्ये भक्ष ठेवण्यात आले आहे. लवकरच बिबट्या जेरबंद होईल, अशी अपेक्षा श्री. लांडे यांनी व्यक्त केली आहे. यासाठी पत्रकार राजेंद्र देसाई यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याने गौरव यादव यांनी वनाधिकारी तसेच पत्रकार राजेंद्र देसाई यांचे आभार मानले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com